कळंब-पाषाणे रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात वृक्षतोड

By Raigad Times    17-Feb-2025
Total Views |
 KARJT
 
कर्जत | तालुक्यातील कळंब-पाषाणे या प्रमुख जिल्हा मार्ग रस्त्याच्या कडेला खाड्याचा पाडा गावच्या हद्दीतील मोठ्या प्रमाणात जंगलातील झाडे तोडण्यात आली आहेत. या झाडांची तोड इमारती बांधण्यासाठी झाल्याचे दिसून येत आहे. वन विभागाने याकडे पहायला हवे, अशी मागणी पर्यावरण प्रेमी गणेश पारधी यांनी केली आहे.
 
खाडेपाडा गावाच्या हद्दीत रस्त्याच्या अगदी कडेला वाढलेले मोठे जंगल तोडण्यात आले आहे. त्या भागात मोठ्या प्रमाणात नागरीकरण सुरु आहे आणि त्यात इमारती बांधण्याची कामे देखील आजूबाजूला सुरु आहेत. संबंधित जमिनीचे मालक असलेल्या शेतकर्‍याला वन विभागाकडे झाडे तोडण्याची परवानीही दिली असल्याचे म्हटले. मात्र त्या ठिकाणी चक्क इलेक्ट्रिक कटरचा वापर करून झाडे तोडली आहेत. त्यामुळे या झाडांना पुन्हा फुटवा फुटत नाही, असा दावा पर्यावरणप्रेमी गणेश पारधी यांचा आहे.