मुरुड एकदरा पुलाचे काम अपूर्ण अवस्थेत; नागरिक संभ्रमात

By Raigad Times    17-Feb-2025
Total Views |
 Murud
 
मुरुड जंजिरा | मुरुडला जोडणार्‍या महत्त्वाच्या एकदरा पुलाचे दुरुस्तीचे काम अपूर्ण अवस्थेत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. एकदरा पूल ६२ वर्षांपूर्वी बांधण्यात आला होता. मात्र या पुलाची दुरुस्ती न झाल्याने या पुलावरचे सुरक्षित कठडे व बेरींग पूर्णतः खराब झाली आहे.
 
त्यामुळे हा पूल धोकादायक बनला होता. या पुलावरून एकदरा, माझेरी, राजपुरी, खोरा, डोंगरी या गावातील सर्व ग्रामस्थ रोजच्या रोज या पुलावरून मुरुड शहराकडे रोज ये-जा करित असतात. पुलाची दुरुस्ती होत नसल्याने ग्रामस्थांसह पर्यटकांनी नाराजी दर्शवली होती. यांची दखल सार्वजनिक बांधकाम विभागाने घेऊन या पुलाच्या दुरुस्ती करिता ४ कोटी रुपये मंजूर करुन दिले होते. ठेकेदाराने या कामाला २० जानेवारी २०२३ पासून जोमाने सुरुवात केली होती.
 
मात्र सद्यस्थितीत हे काम अर्धव आहे.पुलावरचे कठडे धोकादायक असून एकदा मोटारसायकलचालकाने जर साधारण धडक दिली तर कठडे तुटुन या ठिकाणी मोठा अपघात होऊ शकतो. त्यात हे काम बरेच महिने काम बंद असल्याने ग्रामस्थ संभ्रमात पडले आहेत. याच पुलाच्या कठड्यावर कोळी मच्छिमार बांधव आपल्या बोटीचीदोरखंड टाकुन बोटी नांगर टाकुन उभ्या करत असतात. कठडेचा काम व पुलांचे काम पुन्हा लवकरात लवकर सुरू करावे अशि मागणी होत आहे.