अलिबाग | देशाच्या प्रगतीत मोठे योगदान देणारे मच्छिमार आहेत, त्यांच्या समस्या सोडविण्यात आम्ही सारेच कमी पडलो. मात्र येत्या काळात कोळी बांधवांची ७०० कोटींची कर्ज माफी आम्ही करु, अशी ग्वाही विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली. नॅशनल फिश वर्कर्स फोरम महाराष्ट्र, मच्छिमार कृती समितीने राष्ट्रीय मच्छिमार कार्यशाळेचे आयोजन अलिबाग तालुक्यातील नवगाव कोळीवाडा इथे आयोजित केले होते.
यावेळी ते बोलत होते. अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनीदेखील मच्छिमार बांधवांना न्याय देण्याची भूमिका मांडली. नॅशनल फिश वर्कर्स फोरम ही राष्ट्रीय संघटना मच्छिमारांच्या मागण्या प्रश्न देशपातळीवर काम करत असते. भारताच्या किनार्यालगतची ९ राज्ये, ३ केंद्रशासित प्रदेश, अंदमान निकोबार बेटांवरील मच्छिमार संघटनांशी संलग्न आहे.
वरील पैकी एका राज्यात दरवर्षी कार्यशाळा घेण्यात येते. यावेळी एन एफ एफ अध्यक्ष लिओ कोलासो, जनरल सचिव ओलेनसीओ सीमोन्स, कार्याध्यक्ष रामकृष्ण तांडेल, सरचिटणीस किरण कोळी, चिटणीस उल्हास वाटखरे, मनोहर बैले, भटके विमुक्त समाजाचे ज्येष्ठ नेते राजू साळुंके, अजय सोडेकर, संतोष पाटील, सरपंच नवेदर नवगाव प्रियांती घातकी, आदींसह मच्छिमार संघटनेचे पदाधिकारी व कोळी बांधव उपस्थित होते.