पाली | शिवजयंतीला सरसगड पहिल्या प्रदक्षिणेचे आयोजन

By Raigad Times    18-Feb-2025
Total Views |
 pali
 
सुधागड-पाली | सुधागड संघर्ष संस्थामधील तरुणांनी रायगड प्रदक्षिणेप्रमाणे सरसगड प्रदक्षिणा शिवजयंतीला दि. १९ फेबु्रवारी सकाळी ६ वाजता आयोजित केली आहे. यामुळे सरसगडाच्या भोवतालच्या ऐतिहासिक व नैसर्गिक परिसराची माहिती अनेकांना मिळेल. सरसगड प्रदक्षिणेची ही पहिली मोहीम आहे. त्यामुळे या मोहिमेत सहभागी होण्यासाठी अनेकजण उत्साही आहेत.
 
मात्र या प्रदक्षिणेचा मार्ग खडतर आहे. साहसी, जबाबदार ट्रेकिंगप्रेमीनी अवघड आणि जिद्दी अशा अविस्मरणीय प्रदक्षिणेचा अनुभव जरूर घ्यायला हवा. मात्र अतिउत्साही व नियम न पाळणार्‍या ट्रेकर्सने भाग घेऊ नये. असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे. सरसगड प्रदक्षिणेचा प्राथमिक मार्ग या तरुणांनी पाहिला असून मार्गावर साफसफाई व दिशादर्शक नोंदी देखील करण्यात आल्या आहेत.
 
सरसगड प्रदक्षिणेसाठी शंभर रुपये एव्हढी नाममात्र नोंदणी फी आकारली आहे. नोंदणीसाठी संपर्क अरविंद दंत- ९२७२०७१५३४, कपिल पाटील- ९२२६७८४२५५, अमित निंबाळकर- ९२७३७९०८५०, प्रदीप गोळे- ८०८७५६९२९२ व मिलिंद गोळे- ८४४६२८८१४२ यांच्याकडे करावा. इतर माहिती, अटी व शर्ती नोंदणी करताना दिल्या जातील. असे संघर्ष संस्थेतर्फे सांगण्यात आले.