अलिबाग | क्रिकेट नियमांचा परिसंवाद कार्यक्रम संपन्न

By Raigad Times    19-Feb-2025
Total Views |
 alibag
 
अलिबाग | माणुसकी प्रतिष्ठान अलिबाग व अलिबाग क्रिकेट अ‍ॅकॅडमी किहीम यांच्या यांच्या पुढाकाराने, रायगड जिल्हा पोलीस यांच्या सहकार्याने रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने क्रिकेट नियमांचा परिसंवाद हा कार्यक्रम १३ फेब्रुवारी रोजी अलिबाग येथील जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या जंजिरा हॉलमध्ये येथे संपन्न झाला.
 
या परिसंवादात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे पंच व माजी रणजीपटू हर्षद रावले, एमसीए पंच राजन कसबे यांनी उपस्थितांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांना उत्तरं देऊन उत्तम मार्गदर्शन केले. परिसंवादाचे प्रमुख मार्गदर्शक, एमसीसी लॉ अभ्यासक व आरडीसीएचे मार्गदर्शक, प्रशिक्षक नयन कट्टा यांनी अतिशय सोप्या भाषेत व प्रात्यक्षिकं करून क्रिकेटचे नियम समजावून सांगितले.
 
परिसंवादात एकूण ४१ लोकांनी सहभाग घेतला होता. कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी आरडीसीएचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील, सचिव प्रदीप नाईक, उपाध्यक्ष राजेश पाटील, माणुसकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. राजाराम हुलवान, आरडीसीएच्या महिला क्रिकेट प्रमुख अदिती दळवी, सदस्य अ‍ॅड. पंकज पंडित, प्रदीप खलाटे, रायगड पोलीस उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा उज्ज्वला चंदनशिवे यांच्यासह जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे पंच व क्रिकेटप्रेमी उपस्थित होते.