अलिबाग | रायगड जिल्हा परिषदेच्या मार्फत वरसोली येथे गुरुवारी (दि.२०) पेन्शन अदालतचे आयोजन करण्यात आले होते. या पेन्शन अदालतीत ३५ अर्ज निकाली काढण्यात आले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड व सामान्य प्रशासन उपमुख्य कार्यकारी अधिकारी जालिंदर पठारे यांच्या उपस्थितीत पेन्शन अदालत पार पडली.
१८ जून २०२४ रोजी झालेल्या पेन्शन अदालतमध्ये विविध विभागांचे एकूण ११५ सेवा निवृत्त कर्मचारी यांचे अर्ज प्रलंबित होते. या प्रकरणांचा आढावा मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड व सामान्य प्रशासन उपमुख्य कार्यकारी अधिकारी जालिंदर पठारे यांनी घेतला. यामधील ३५ अर्ज निकाली काढण्यात आले.
तसेच गुरुवारी पार पडलेल्या लोक अदालतमध्ये ३३ सेवा निवृत्त कर्मचार्यांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. सर्व प्रलंबित अर्ज एका महिन्याच्या आत निकाली काढण्याचे ओशासन डॉ. भरत बास्टेवाड व जालिंदर पठारे यांनी संबंधितांना दिले. यावेळी जिल्हा परिषदेच्या शिक्षण, बांधकाम, ग्रामीण पाणी पुरवठा, अर्थ, आरोग्य, ग्रामपंचायत, पशुसंवर्धन विभागांमधील प्रतिनिधी उपस्थित होते.