पाली येथे वारंवार होणार्‍या पाणीगळतीने नागरिक त्रस्त

By Raigad Times    22-Feb-2025
Total Views |
 pali
 
सुधागड-पाली | पाली नगरपंचायतीचा भोंगल कारभार वारंवार होणार्‍या पाणी गलती थांबवण्यात नगरपंचायत अपयशी ठरत आहे. हटाळेेशर चौकातील सतत रहदारी असणार्‍या मार्गावर पटेल यांच्या किराणा मालाच्या दुकानालगतच्या पाण्याची पाईपलाईन फुटली असून पाण्याची गळती सुरू आहे.
 
नगरपंचायतीने दुरुस्तीच्या नावाखाली खड्डा खोदून ठेवला आहे व त्याची माती रस्त्यावर असल्यामुळे वाहतुकीला अडचण होत आहे. तसेच खोदलेल्या खड्ड्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत आहे, ज्यामुळे शेकडो लिटर पाणी वाया जात आहे. वारंवार पालीमधील होणार्‍या पाणी गलतीला जबाबदार कोण?
 
पालीतील पाणी गळतीची समस्या थांबणार तरी कधी? याबाबत पाली नगरपंचायतीच्या मुख्य अधिकारी लक्ष देतील का? वारंवार होणार्‍या पाणी गळतीमुळे नागरिकांना पाण्याच्या टंचाईला सामोरे जावे लागत आहे. पाली नगरपंचायत यावर ठोस उपाययोजना केव्हा करणार? असा सवाल सर्वसामान्य जनता विचारत आहे.