खोपोली | मंदीर संस्कृतीचे रक्षण, मंदीर हिताच्या दृष्टीने योजना आखणे आणि मंदिरांचे संघटन व्हावे, यासाठी श्री अष्टविनायक क्षेत्रापैकी श्री गणपती संस्थान महड येथे विश्वशांती मंगल कार्यालयात महाराष्ट्र मंदीर महासंघ आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ‘महाराष्ट्र मंदीर न्यास अधिवेशन’ रविवारी, २३ फेब्रुवारी रोजी संपन्न झाले.
अधिवेशनाच्या प्रारंभी दीपप्रज्वलन सनातन संस्थेच्या प्रमुख सद्गुरू अनुराधा वाडेकर, श्री गणपती संस्थान महड कार्याध्यक्षा अॅड. मोहिनी वैद्य यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी सनातन संस्थेच्या प्रवक्ते अभय वर्तक, महाराष्ट्र मंदीर महासंघाचे संघटक संजय जोशी, धर्मदाय अधिन माहिती अभिवक्ता स्वाती दिक्षीत, विविध मंदीर विश्वस्त पुजारी उपस्थित होते. विचारवंत मंडळी एकत्र येतात तेव्हा विचाराची देवाणघेवाण होते.
त्यातून समाजाचे कल्याण होते, असे मत श्री गणपती संस्थान महड कार्याध्यक्षा अॅड.मोहिनी वैद्य यांनी बोलताना व्यक्त केले. हाताची बोटं एकत्र होतात तेव्हा वज्रमूठ तयार होते, एकट्या माणसाच्या मागे संघटना उभी राहिली की संघटन मोठे होते असेही वैद्य यांनी सांगितले. मंदिरांमुळेच धर्म टिकला आहे, पंचसूत्रांवर कार्य सुरू असल्याचे सनातन संस्थेच्या प्रवक्ते अभय वर्तक यांनी सांगत मंदिरासंबंधीचे आडचणी, माहिती उपस्थितांसमोर मांडत विस्तृत चर्चा केली. धर्मदाय अधिन माहिती अभिवक्ता स्वाती दिक्षीत यांनी माहिती उपस्थितांना सांगितले.