उरण | तालुयातील करंजा गावातील समुद्रकिनारी डागडुजीसाठी मच्छिमार बोटी उभ्या आहेत. सोमवारी (२४ फेब्रुवारी) व मंगळवारी (२५ फेब्रुवारी) डागडुजी सुरू असलेल्या दोन मच्छिमार बोटींना आग लागल्याची घटना घडली. मंगळवारी दुपारच्या वेळेत वेल्डिंगचे काम सुरू असताना बोटीतील काही भागाला अचानक आग लागली.
त्यामुळे त्वरित घटनास्थळी अग्निशमन दलाला बोलविण्यात आली. त्यानंतर अग्निशमन दलाची गाडी दाखल होऊन जवानांनी आग विझवली; अन्यथा भडका उडून आजूबाजूच्या उभ्या असलेल्या बोटींना आग लागण्याची भीती होती. दोन दिवसांत दोन बोटींना आगी लागण्याची घटना घडल्याने बोट मालकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.