‘सह्याद्री’ने रोखली वन्यजीव, वृक्षांची होळपळ , माणगाव, रोह्यातील ११५ वणव्यांपैकी ८० वणवे विझवण्यात यश

By Raigad Times    04-Mar-2025
Total Views |
 pali
 
पाली/बेणसे | रायगडच्या अनेक तालुयातील डोंगर पट्ट्यात मोठ्या प्रमाणावर वणवे लागत आहेत. सततच्या वणव्यांमुळे सजीव सृष्टीची होळपळ होत आहे. जिल्ह्यातील माणगाव व रोहा तालुयात मागील चार आठवड्यात ११५ ठिकाणी वणवे लागल्याची नोंद झाली. त्यापैकी तब्बल ८० वणवे यशस्वीरित्या विझवण्यामध्ये सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्थेला यश आले. यामुळे शेकडो वन्यजीव व वृक्षांची होळपळ रोखली गेली आहे.
 
विशेष म्हणजे आधुनिक उपकरणांचा वापर करून जलद गतीने वणव्यांवर नियंत्रण मिळवण्यात आले. यासाठी वनविभागाचे देखील मोलाचे सहकार्य लाभले. सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्था, रेस्यू चॅरिटेबल ट्रस्ट पुणे, दीपक नाइट्रेट लिमिटेड रोहा तसेच सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान या टीम वणवे विझवण्यामध्ये सहभागी झाल्या होत्या. त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
 
हे वणवे रोखण्यासाठी प्रयाग बामुगडे, सागर दहिंबेकर, शुभम सणस, आदेश पाटेकर, अजय बोगटे, विशाल जाधव, निलेश लोखंडे अजय राजीवले, प्रणय सागवेकर, विनय ठाकूर, प्रवीण भगत, अनुप देशमुख, कृतिका वारंगे, विजया मगर, श्रावणी भोई, स्वयम् धनावडे, यश सानप, युतीश बारटक्के, सुजल पडवळ, ओंकार पडवळ आदींनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. टीमपर्यंत ज्यावेळी वणवे लागण्याची खबर पोहोचली त्यावेळी क्षणाचाही विलंब न करता ही टीम तत्परतेने वणवे विझवण्यासाठी पोहोचली. उपलब्ध साधनसामग्रीचा पुरेपूर वापर करून वणव्यांवर नियंत्रण मिळवता आले.
 
pali
 
दिवस असो की रात्र, टीम लागलीच वणवा लागला आहे, त्या ठिकाणी पोहोचून आपली कामगिरी तत्परतेने करत होती. तीव्र डोंगर उतार, दरी अशा धोयाच्या ठिकाणीदेखील जाऊन जीवाची बाजी लावून वणव्यांवर नियंत्रण मिळवण्यात आले. या वणव्यांना विझवण्यात यश आल्यामुळे येथील वन्यजीव, सूक्ष्मजीव आणि झाडे झुडपे व वनस्पती यांचा जीव वाचला परिणामी सजीव सृष्टीवरील संकट टळले. याशिवाय पर्यावरण प्रदूषित होण्यापासून देखील रोखता आले.
 
सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्थेला कोणताही शासकीय सहाय्यता नसूनसुद्धा ३ हजार ५०० हून अधिक वणवे ५ वर्षांमध्ये विझवण्यामध्ये यश आले आहे. संस्थेला तातडीने एयर ब्लोअरची आवश्यकता होती. २४ फेब्रुवारी रोजी रेस्यू चॅरिटेबल ट्रस्ट पुणे यांच्यामार्फत संस्थेला १ लाख २५ हजार रुपयांचे एअर ब्लोअर भेट स्वरूपात देण्यात आले आहेत. तसेच नंदू चव्हाण यांनी एअर ब्लोअरसाठी तब्बल आठ हायड्रेशन बॅक तसेच आठ हेड टॉर्च भेट दिल्या. या उपक्रमामुळे वणव्यांवर नियंत्रण मिळवणे अधिक जलद व सोपे होत आहे.
 
जंगलाला लागणार्‍या वणव्यांसाठी आमची टीम अहोरात्र कष्ट करत आहोत. यासाठी आम्ही ‘ऑपरेशन अरण्य आपदव’ ही मोहीम राबवित आहोत. याकरिता आपण सर्वांनी सहभागी व्हावेत, ही आमची इच्छा आहे. तरी आपल्या गावातील, शहरातील, सोसायटीतील जेवढे ग्रुप व लोक असतील त्यांनी वणवा लागल्यास आम्हाला संपर्क करा. ९९२२३३०२८६, ७३८५७४४२५०, ७४४७३५७२९९ जेणेकरून आपण अधिक गतीने वनवे नियंत्रणात आणू शकतो. -सागर दहिंबेकर, सदस्य, सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्था