महाड येथील चवदार तळ्यात तरुण बुडाला
By Raigad Times 04-Mar-2025
Total Views |
महाड| महाड येथील चवदार तळ्यात एक तरुण बुडाल्याची घटना सोमवारी घडली. या तरुणाला नागरीकांनी बाहेर काढून सरकारी दवाखान्यात दाखल केले आहे. हा तरुण तळ्यात पडला की आत्महत्येचा प्रयत्न केला हे समजू शकले नाही.
सोमवार ३ मार्च रोजी रात्री चवदार तळ्यात एक तरुण बुडत असल्याचे काही नागरीकांच्या लक्षात आले. त्यामुळे त्याला वाचवून सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या तरुणाचे नाव समजू शकले नाही.