ऑटोरिक्षा मीटर रिकॉलिब्रेशनला आता ३१ मे पर्यंत दिली मुदतवाढ

By Raigad Times    05-Mar-2025
Total Views |
 alibag
 
अलिबाग | ३ मार्च ते ३१ मे पर्यंत ऑटोरिक्षा व मीटर टॅक्सी मीटर रिकॉलिब्रेशनला पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे. याची सर्व परवानाधारक, वाहन चालकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी पेण यांनी केले आहे.
 
प्रादेशिक परिवहन प्राधिकरण रायगड यांच्या ५ सप्टेंबर २०२४ बैठकीतील निर्णयान्वये ऑटोरिक्षा, मीटर टॅक्सी यांच्या भाडेदर वाढीस मान्यता देण्यात आली आहे.
 
त्याकरिता १ जानेवारी ते २८ फेब्रुवारी या कालावधीत भाडेमीटर रिकॉलिब्रेशन करुन घेण्याबाबत १ जानेवारी २०२५ रोजी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले होते. मात्र आता रिकॉलिब्रेशनला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार, आता ३१ मे पर्यंत परवानाधारक, वाहनचालकांना मीटर रिकॉलिब्रेशन करता येणार आहे.