कर्जत तालुक्यात कोरोनाचे 15 नवे रुग्ण; एकाचा मृत्यू

0
285

बाधितांमध्ये पशुवैद्यकीय अधिकार्‍याचा समावेश

कर्जत : कर्जत तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. कोरोनाने शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागही व्यापला आहे. आज कर्जत शहरात राहणार्‍या एका पशुवैद्यकीय अधिकार्‍यासह कोरोनाचे 15 नवे रुग्ण आढळले असून एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत तालुक्यात 487 कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 18 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 363 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

आज (30 जुलै) तालुक्यात 15 रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 5 रुग्ण कर्जत नगरपरिषद हद्दीतील असून 10 रुग्ण तालुक्याच्या ग्रामीण भागातील आहेत. कर्जत शहरातील विठ्ठलनगर भागात राहणार्‍या व कर्जत पंचायत समितीमध्ये कार्यरत असलेल्या 57 वर्षीय पशुवैद्यकीय अधिकार्‍याचा कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. म्हाडा वसाहतीतील एका 80 वर्षीय व्यक्तीलाही कोरोनाची लागण झाली असून ही व्यक्ती पूर्वी टेलरिंगचे काम करीत होती. दहिवलीतील एका 65 वर्षीय व्यक्ती व त्याच्या 58 वर्षीय पत्नीचा कोरोना टेस्टचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. तर नेरळमध्ये एका 65 वर्षीय निवृत्त शिक्षिकेला व तिचा इंजिनिअर असलेल्या 24 वर्षीय मुलाला कोरोनाची लागण झाली आहे.

कडावमध्ये एका 40 वर्षीय तरुणाला कोरोनाची बाधा झाली असून नेरळ नजीकच्या बेकरे गावात एका 50 वर्षांच्या महिलेचा कोरोना टेस्टचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. के.बी.के.नगर शेलू येथील एका 29 वर्षांच्या युवकालाही कोरोनाची बाधा झाली आहे. पळसदरी परिसरात 55 वर्षीय महिलेलाही कोरोनाची बाधा झाली असून तिच्या कुटुंबातील काही सदस्यसुद्धा कोरोना बाधित होते. मोठे वेणगाव येथील एका 44 वर्षांच्या व्यक्तीचा कोरोना टेस्टचा रिपोर्टही पॉझिटीव्ह आला आहे. तर कर्जतमधील एका 54 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे.

दरम्यान, सद्यस्थितीत तालुक्यातील 106 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here