कर्जत तालुक्यात महिला डॉक्टरसह 16 कोरोना पॉझिटीव्ह

0
1378

कर्जत : कर्जत तालुक्यात कोरोना थांबायचे नाव घेत नाहीये. दररोज रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. सुरुवातीच्या दोन दिवस एक आकडी संख्येने कोरोनाचे रुग्ण सापडत होते. मात्र आज (19 जुलै) एकदम 16 कोरोना रुग्ण सापडल्याने कर्जतकरांच्या भुवया उंचावल्या आहेत. आतापर्यंत तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या 340 वर पोहोचली असून यापैकी 214 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

आज कर्जत शहरात राहणार्‍या एका 45 वर्षांच्या महिला डॉक्टरचा कोरोना टेस्टचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. म्हाडा कॉलनीमध्ये राहणार्‍या 36 वर्षीय व्यक्तचा कोरोना टेस्टचा अहवाल पॉझिटीव्ह आला असून ते बेलापूर येथे भूमापन कार्यालयात कार्यरत आहेत. भालीवडी गावातील एका 48 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली असून ही व्यक्ती माजी उपसरपंच आहे. कर्जत शहरातील एका 25 वर्षांच्या युवकाचा कोरोना टेस्टचा अहवाल पॉझिटीव्ह आला असून ही व्यक्ती उद्योजक असून तिची चौक गावानजीक वह्या उत्पादनाची कंपनी आहे.

काही दिवसांपूर्वी एका झेरॉक्स सेंटर चालविणार्‍या युवकाला कोरोनाची बाधा झाली होती. आज त्याच्या 30 वर्षीय पत्नीचा कोरोना टेस्टचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. दहिवली सोनार आळीतील एका 61 वर्षांच्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. मुद्रे बुद्रुकमध्ये राहणार्‍या एक 57 वर्षांच्या व्यक्तीचा कोरोना टेस्टचा अहवाल पॉझिटीव्ह आला असून ही व्यक्ती मध्य रेल्वेची कर्मचारी आहे. महावीर पेठेतील एका 57 वर्षांच्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे.

हालीवली येथील एका 33 वर्षीय युवकाचा कोरोना टेस्टचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. मोठे वेणगावमधील एका 35 वर्षांच्या युवकाला कोरोनाची बाधा झाली असून हा तरुण अंबरनाथ येथे नोकरी करीत आहे. तिघर गावात वास्तव्यास असलेल्या एका 50 वर्षांच्या व्यक्तीचा कोरोना टेस्टचा अहवाल पॉझिटीव्ह आला असून ही व्यक्ती कर्जत वीज वितरण कंपनीत वायरमन म्हणून कार्यरत आहे. कर्जत लक्ष्मीकांत वाचनालयाच्या परिसरात राहणार्‍या एका 59 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली असून ही व्यक्ती मध्य रेल्वेची कर्मचारी म्हणून मुंबईत कार्यरत आहे.

जुन्या एसटी स्टँड परिसरात राहणार्‍या एका 36 वर्षीय महिलेचा कोरोना टेस्टचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. मुंबई महानगरपालिकेत नोकरी करीत असलेल्या नेरळ हेटकर आळीत राहणार्‍या एका 38 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. तर मुंबईहून हेटकर आळीतच काही दिवसांपूर्वी रहायला आलेल्या एका 36 वर्षीय युवकाचा कोरोना टेस्टचा रिपोर्टही पॉझिटीव्ह आला आहे.उकरूळ येथे राहणार्‍या एका 22 वर्षांच्या युवतीलासुद्धा कोरोनाची बाधा झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here