म्हसळा तालुक्यात कोरोनाचे 2 नवे रुग्ण

0
448
  • दिवसभरात 2 रुग्णांची कोरोनावर मात
  • बाधित रुग्णांची संख्या 196 वर

सुशील यादव/म्हसळा । म्हसळा तालुक्यात आज (1 ऑगस्ट) कोरोनाच्या 2 नवीन रुग्णांची नोंद झाली असून दोन रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. आजअखेर तालुक्यात बाधित रुग्णांची संख्या दोनशेच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे.

आज कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आलेले दोनही रुग्ण या महिला आहे. गोंडघर येथील 1 आणि सानेआळी-म्हसळा येथील 1 अशा दोन महिलांना कोरोना लागण झाली आहे. तर आज दिवसभरात देवघर येथील 1 व सोनार आळी येथील 1 अशा दोन रुग्णांनी कोरोनावर मात केल्याची माहिती म्हसळा तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी शरद गोसावी यांनी दिली.

दरम्यान, आजअखेर म्हसळा तालुक्यात बाधित रुग्णांची संख्या 196 वर पोहोचली आहे. यापैकी 123 जण कोरोना मुक्त झाले असून 7 रुग्ण दगावले आहेत. सद्यस्थितीत तालुक्यातील 66 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here