म्हसळा तालुक्यात कोरोनाचे 2 नवे रुग्ण

0
342
  • आज 6 जणांची कोरोनावर मात

  • बाधित रुग्णांची संख्या 194 वर

सुशील यादव/म्हसळा : म्हसळा तालुक्यात आज (31 जुलै) कोरोनाच्या 2 नवीन रुग्णांची नोंद झाली असून, दिवसभरात सहा रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तालुक्यात आजअखेर बाधित रुग्णांची संख्या 194 वर पोहोचली आहे.

आज कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आलेल्या रुग्णांपैकी 1 रुग्ण कांदळवाडा येथील आहेत. तर दुसरा रुग्ण आहे म्हसळा पोलीस ठाण्याजवळील राहणारा आहे. या दोन नव्या रुग्णांमुळे म्हसळा तालुक्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 194 वर पोहोचली आहे. तसेच आज तालुक्यातील 6 जणांनी कोरोनावर मात केल्याची माहिती तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी शरद गोसावी यांनी दिली.

दरम्यान, बाधित रुग्णांपैकी 121 जण कोरोना मुक्त झाले असून, 7 रुग्ण कोरोनामुळे दगावले आहेत. सद्यस्थितीत म्हसळा तालुक्यातील उपचार सरू असलेल्या रुग्णांची संख्या 66 आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here