श्रीवर्धनमध्ये कोरोनाचे 2 नवे रुग्ण ; बाधित रुग्णांची संख्या 141 वर

0
564

श्रीवर्धन : श्रीवर्धन तालुक्यात आज कोरोनाचे 2 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर तीन रुग्णांची कोरोनावर मात केली. आजअखेर तालुक्यात बाधित रुग्णांची संख्या 141 झाली आहे.

आज (30 जुलै) कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आलेल्या रुग्णांमध्ये मेघरे येथील 1 आणि गुलडक फाटा-बोर्लीपंचतन येथील एका रुग्णाचा समावेश आहे.  मेघरे येिील 65 वर्षीय वृद्ध महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. तर गुडलक फाटा-बोर्लीपंचतन येथील 73 वर्षीय ज्येष्ठ व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

आज दिवसभरात सतीची वाडी पो. वडघर येथील  54 वर्षीय महिला, 25 वर्षीय तरुण आणि 56 वर्षीय व्यक्तीने कोरोनावर मात केली. कोरोना मुक्त झाल्याने या रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी मिळाली आहे. आजअखेर तालुक्यातील 108 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत.

दरम्यान, तालुक्यात बाधित रुग्णांची संख्या 141 झाली आहे. यापैकी  108 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. तर चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत 29 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती श्रीवर्धन तहसील कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here