पेण तालुक्यात आज कोरोनाच्या 22 रुग्णांची नोंद

0
1405
  • 39 रुग्णांनी केली कोरोनावर मात
  • बाधित रुग्णांची संख्या 1 हजार 203 वर

पेण : पेण तालुक्यात आज कोरोनाच्या 22 रुग्णांची नोंद झाली असून, बाधित रुग्णांचा आकडा 1 हजार 203 वर पोहोचला आहे. दिवसभरात 39 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केल्याने, त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. आजअखेर तालुक्यातील 924 रुग्णांनी कोरोनाला हरवले आहे.

आज (1 ऑगस्ट) कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आलेल्या रुग्णांमध्ये समर्थनगर-रामवाडी येथील 55 वर्षीय पुरुष, म्हाडा कॉलनी-पेण येथील 26 वर्षीय तरुण, फणसडोंगरी येथील 36 वर्षीय पुरुष, वाशी येथील 40 वर्षीय पुरुष, पिंपळपाडा येथील 37 वर्षीय पुरुष, पालखार येथील 51 वर्षीय पुरुष व 27 वर्षीय तरुण, नंदीमाळ नाका येथील 42 वर्षीय पुरुष, हनुमानआळी येथील 62 वर्षीय वृद्ध, प्राजक्ता सोसायटी-पेण येथील 60 वर्षीय वृद्ध महिला, 40 वर्षीय पुरुष, 34 वर्षीय महिला आणि 31 वर्षीय पुरुष, गोदावरीनगर येथील 55 वर्षीय पुरुष, धोंडपाडा येथील 26 वर्षीय तरुण, राजू पोटे मार्ग पेण येथील 35 वर्षीय महिला, आर.पी.नगर रामवाडी येथील 37 वर्षीय पुरुष, चिंचपाडा येथील 30 वर्षीय महिला व 30 वर्षीय तरुण, इंद्रनगर वडखळ येथील 27 वर्षीय तरुण, आंबेघर येथील 45 वर्षीय व 37 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.

तर दिलासा देणारी बाब म्हणजे, आज दिवसभरात 39 रुग्ण कोरोनाच्या विळख्यातून सुखरुप बाहेर पडून ठणठणीत बरे झाले आहेत. त्यामुळे रुग्णालयातून त्यांना सुट्टी देण्यात आली. यामध्ये पाटणेश्‍वर येथील 1, विठ्ठलआळी 3, देवनगरी 2, ईएमव्हीआयएस सिटी कोर्टाजवळील 1, रावे 3, इंद्रनगर वडखळ 1, गडब 1, रोहिदासनगर 1, प्रभूआळी 3, चिंचपाडा 2, लाल बहादूर शास्त्री मार्ग 2, वरेडी 1, काळेश्री 3, समर्थनगर रामवाडी 1, कुंभारआळी 1, झोतिरपाडा 1, कुहिरे 1, तरशेत 1, शिहू 1, सुरक्षानगर पेण 1, रिलायन्स टाऊनशिप 2, बेणसे 1, शिवाजी चौक पेण 1, देवआळी 1, ठाकूरबेडी 1, जिते 1, वाशी येथील 1 रुग्णाचा समावेश आहे.

दरम्यान, आजअखेर पेण तालुक्यात बाधित रुग्णांची संख्या 1 हजार 203 वर पोहोचली आहे. यापैकी 29 रुग्णांचा मृत्यू झाला असून, 924 रुग्ण बरे झाले आहेत. सद्यस्थितीत 250 रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती पेण तहसील कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here