अलिबाग तालुक्यात आज कोरोनाचे 24 नवे रुग्ण; एक मृत्यू

0
6552
  • दिवसभरात 28 जणांची कोरोनावर मात
  • बाधित रुग्णांची संख्या 1 हजार 43 वर

अलिबाग : अलिबाग तालुक्यात आज 24 जणांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली असून, यापैकी एका महिला रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तर दिवसभरात 28 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. नव्याने नोंद झालेल्या रुग्णांमध्ये नवेदर नवगाव, शहाबाज, पेझारी, चेंढरे, पांडवादेवी, फोफेरी, किहीम, थेरोंडा, मांडवा, पिंपळभाट, वेश्‍वी येथील रुग्णांचा समावेश आहे.

तहसीलदार सचिन शेजाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, नवेदर नवगाव येथील 51 वर्षीय महिलेला कोरोना झाला आहे. शहाबाज येथील तिघांना कोरोना लागण झाली असून, यामध्ये 50 वर्षीय, 60 वर्षीय व 40 वर्षीय पुरुषांचा समावेश आहे. पेझारी येथेही तीन रुग्ण नोंदवले गेले असून, येथील 30 वर्षीय, 31 वर्षीय व 37 वर्षीय तरुणांना कोरोनाने ग्रासले आहे. तर पेझारी भैरवनाथ मंदिर परिसरातील 44 वर्षीय व्यक्तीला कोरोना झाला आहे. चेंढरेतील 42 वर्षीय महिलेला, मातृप्रेम-अलिबाग येथील 66 वर्षीय महिलेला, पांडवादेवी-पोयनाड येथील 70 वर्षीय वृद्ध व 64 वर्षीय वृद्ध महिलेला, झिराडपाडा येथील 33 वर्षीय महिलेला, थेरोंडा येथील 76 वर्षीय वृद्धाला कोरोनाची लागण झाली आहे.

फोफेरी-चिंचवली येथील 61 वर्षीय वृद्ध, 19 वर्षीय तरुण आणि 52 वर्षीय महिलेला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. साईनगर किहीम येथील दोघांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली असून, यामध्ये 65 वर्षीय महिला आणि 38 वर्षीय महिलेचा समावेश आहे. मांडवा साईबाबा मंदिर परिसरातील 71 वर्षीय वृद्ध महिला व 44 वर्षीय पुरुष अशा दोघांची कोविड टेस्ट पॉझिटीव्ह आली आहे. यापैकी 71 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. गुरवनगर-पिंपळभाट येथील 42 वर्षीय पुरुषाला कोरोना झाला आहे. तर वेश्‍वीतील संतोषी माता मंदिर परिसरात राहणार्‍या 48 वर्षीय व्यक्तीला तर कृष्णाधाम सोसायटी-अलिबाग येथील 52 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली आहे.

आज दिवसभरात 28 रुग्णांनी कोरोनाला हरवले. कोरोना मुक्त झाल्याने या सर्वांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामध्ये रेवदंडा येथील 1, बोडणी 1, चावडी मोहल्ला 2, श्रीबाग नं.2 येथील 1, मांडवखार 3, रेवस 2, चेंढरे आनंदनगर 2, आरसीएफ कॉलनी कुरुळ 1, चरी 3, पेझारी 2, कार्ले 2, अलिबाग पोस्ट ऑफिसजवळील 1, तारांगण सोसायटी-अलिबाग येथील 3, शास्त्रीनगर-अलिबाग 1, परहूरपाडा 1, चिंचोटी 2 रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आजअखेर अलिबाग तालुक्यात बाधित रुग्णांची संख्या 1 हजार 43 वर पोहोचली आहे. यापैकी 30 रुग्णांचा मृत्यू झाला असून, 838 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. सद्यस्थितीत 175 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती तहसीलदार शेजाळ यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here