उरण तालुक्यात आज कोरोनाचे 24 नवे रुग्ण; बाधित रुग्णांची संख्या 852 वर

0
312
घन:श्याम कडू/उरण : उरणमध्ये आज कोरोनाचे 24 रुग्ण आढळले आहेत. तर 20 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आजअखेर उरण तालुक्यात बाधित रुग्णांची संख्या 852 वर पोहोचली आहे. यापैकी 650 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून,  28 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली.

आज (30 जुलै) नोंद झालेल्या पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये डाऊरनगर 2, जसखार 2, बालई 1, नागाव 1, आवरे 1, गणेश नगर केगाव 1, सोनारी 1, क्लासिक पार्क सोसायटी उरण 1, चिरनेर 1, कोटनाका 1, वशेणी 2, मोरा 1, बोकडविरा 1, वाणी आळी 1, दिघोडे 1, श्रीयोग अपार्टमेंट उरण 1, पंचवटी करंजा 1, नवापाडा करंजा 1, केगाव 1, बोरखार 1, जासई 1 अशा 24 रुग्णांचा समावेश आहे.

आज जसखार 1, मोठी जुई 1, म्हातवली 1, जेएनपीटी 3, सोनारी 1, बोकडविरा 1, कोप्रोली 2, वाणी आळी 7, दिघोडे 2, जासई 1 अशा 20 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, सद्यस्थितीत तालुक्यातील 174 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here