अलिबाग तालुक्यात आज कोरोनाचे 28 नवे रुग्ण; एकाचा मृत्यू

0
7827
  • बाधित रुग्णांची संख्या 395 वर
  • 160 रुग्णांची कोरोनावर मात; 10 जणांचा मृत्यू
  • 225 पॉझिटीव्ह रुग्णांवर सुरु आहेत उपचार

अलिबाग : अलिबाग शहरासह तालुक्यात आज कोरोनाच्या 28 नव्या रुग्णांची नोंद झाली असून, यापैकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. अलिबाग कोळीवाड्यात आज सर्वाधिक 9 रुग्णांची नोंद झाली आहे. तर आजअखेर तालुक्यात बाधित रुग्णांची संख्या चारशेच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. तर 10 रुग्णांचा कोरोनाने बळी गेला आहे.

अलिबागचे तहसीलदार सचिन शेजाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज (13 जुलै) नोंद झालेल्या रुग्णांमध्ये अलिबाग कोळीवाडा, रेवस कोळीवाडा, वरसोली कोळीवाडा, चेंढरे, विद्यानगर, आरसीएफ कॉलनी-कुरुळ, रेवस, पिंपळभाट, अलिबाग बाजारपेठ, म्हात्रोळी-सारळ, पोयनाड येथील रुग्णांचा समावेश आहे.

अलिबाग कोळीवाड्यात आज सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे. येथे 9 रुग्ण नोंदविण्यात आले आहेत. 38 वर्षीय महिला, 6 वर्षाचा बालक, 18 वर्षीय तरुणी, 10 वर्षांचा मुलगा, 36 वर्षीय महिला, 48 वर्षीय पुरुष, 17 वर्षीय तरुणी, 21 वर्षीय तरुणी, 14 वर्षांची मुलगी अशा नऊ जणांची कोरोना चाचणी आज पॉझिटीव्ह आली आहे.

विद्यानगर येथील 50 वर्षीय व्यक्तीला, चेंढरे एमआयडीसी समोरील आदित्य सोसायटी येथील 53 वर्षीय महिलेला कोरोना झाला आहे. वैभवनगर येथील वरुण सोसायटीतील दोघांना कोरोनाची लागण झाली आहे. येथील एका 66 वर्षीय वृद्धेची आणि 19 वर्षीय तरुणीची कोविड चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. विद्यानगर येथील 24 वर्षीय तरुणीला कोरोना झाला आहे.

वरसोली कोळीवाड्यातील दांडेपाडा येथे आज दोन रुग्णांची नोंद झाली आहे. येथील 35 वर्षीय महिलेला व 40 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. कुरुळ आरसीएफ कॉलनी येथील 29 वर्षीय तरुण, बोडणी-रेवस येथील 36 वर्षीय महिला, रेवस येथील 35 वर्षीय व्यक्ती आणि पिंपळभाट येथील रसिका सीएचसीमधील 54 वर्षीय व्यक्तीची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे.

अलिबाग बाजारपेठ येथील ओझोन रेसिडन्सी येथील 42 वर्षीय व्यक्तीला, म्हात्रोळी-सारळ येथील 40 वर्षीय व्यक्तीला, अलिबाग लबैक कॉम्प्लेक्स येथील 62 वर्षीय ज्येष्ठ व्यक्तीला, कृष्णदर्शन सोसायटी येथील 27 वर्षीय तरुणाला तर पोयनाड जमुना नगर येथील 7 वर्षीय मुलीला व 32 वर्षीय महिलेला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर गंगासागर बिल्डींग-अलिबाग येथील एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. या व्यक्तीची कोरोना चाचणीही आज पॉझिटीव्ह आली आहे.

तर आज रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. गोंधळपाडा येथील 1, फुफादेवीपाडा रेवस येथील 1, ब्राह्मणआळी येथील 1, चेंढरे शिवाजी नगर येथील साईकृपा सोसायटीतील 1, वरसोली कोळीवाड्यातील बनापाडा येथील 1, पिंपळभाट स्वामी समर्थ नगर येथील 1 आणि काविर (बोरपाडा) येथील 1 अशा सात रुग्णांना कोरोना मुक्त झाल्याने रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

दरम्यान, तालुक्यात आजअखेर कोरोना बाधित रुग्णांची संख्या 395 वर पोहोचली आहे. यापैकी 160 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत तर 225 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आतापर्यंत 10 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला असल्याची माहिती तहसीलदार शेजाळ यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here