रायगडमध्ये आज कोरोनाचे 299 नवे रुग्ण; 9 जणांचा मृत्यू

0
3835
  • आज 406 रुग्ण कोरोना मुक्त होऊन परतले घरी
  • बाधित रुग्णांची संख्या पोहोचली 11 हजार 144 वर

अलिबाग : रायगडात गेल्या दोन दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या थोड्या प्रमाणात काही होईना घटल्याचे दिसते आहे. आज (21 जुलै) जिल्ह्यात 299 रुग्णांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली असून, 9 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 406 रुग्ण उपचारानंतर कोरोना मुक्त होऊन आज घरी परतले, ही रायगडकरांसाठी दिलासा देणारी बाब आहे.

आजअखेर जिल्ह्यात बाधित रुग्णांची संख्या 11 हजार 144 वर पोहोचली आहे. आज नव्याने नोंद झालेल्या 299 रुग्णांमध्ये 156 रुग्ण हे एका पनवेल तालुक्यातील आहेत. यात पनवेल महापालिका क्षेत्रात 112 आणि पनवेल ग्रामीणमध्ये 44 रुग्ण नोंदविण्यात आले आहेत. त्याखालोखाल अलिबागमध्ये 44, खालापूरमध्ये 38, पेणमध्ये 18, रोह्यात 16, कर्जतमध्ये 4, महाडमध्ये 3, मुरुडमध्ये 2, श्रीवर्धन आणि तळामध्ये प्रत्येकी 1 रुग्ण आहे. आज नऊ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतल्याने मृतांचा आकडा 293 वर गेला आहे. आज मृत पावलेल्या रुग्णांमध्ये पनवेल मनपा आणि उरणमधील प्रत्येकी 3 तर खालापूर, अलिबाग, रोहामधील प्रत्येकी 1 रुग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यात मृत्यूचे प्रमाण एकूण रुग्णांच्या 3 टक्के आहे.

एकीकडे बाधित रुग्ण आणि मृत्यूंचा आकडा वाढत चालला असला तरी, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जिल्ह्यात समाधानकारक आहे. आज दिवसभरात 406 जणांनी कोरोनावर मात केली. पनवेल मनपा 137, पनवेल ग्रामीण 51, उरण 15, खालापूर 25, कर्जत 18, पेण 68, अलिबाग 21, मुरुड 16, माणगाव 3, रोहा 16, सुधागड 1, श्रीवर्धन 10, महाडमध्ये 22, पोलादपूरमध्ये 3 रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. आतापर्यंत बाधित रुग्णांपैकी 7 हजार 293 रुग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी परतले आहेत. रुग्ण बरे होण्याचे हे प्रमाण 62 टक्के आहे.

सद्यस्थितीत जिल्ह्यात पनवेल मनपा 1 हजार 435, पनवेल ग्रामीण 495, उरण 162, खालापूर 343, कर्जत 78, पेण 370, अलिबाग 368, मुरुड 23, माणगाव 51, तळा 2, रोहा 78, सुधागड 2, श्रीवर्धन 28, म्हसळा 55, महाड 63, पोलादपूर 5 अशा एकूण 3 हजार 558 अ‍ॅक्टीव्ह रुग्ण आहेत. या सर्व पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहे. तर कोरोना चाचणी केलेल्या 513 रुग्णांचे तपासणी अहवाल प्रलंबित आहेत.


कोणत्या तालुक्यात किती झालेत मृत्यू?

जिल्ह्यात आतापर्यंत 293 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. यामध्ये पनवेल मनपा क्षेत्रात सर्वाधिक 121 मृत्यू झाले आहेत. त्याखालोखाल पनवेल ग्रामीणमध्ये 32 मृत्यूंची नोंद झाली आहे. त्याखालोखाल उरणमध्ये 21, खालापूरात 18, अलिबागमध्ये 19, पेणमध्ये 17 रुग्ण कोरोनाने दगावले आहेत. महाडमध्ये 15, कर्जतमध्ये 12, मुरुडमध्ये 8, माणगाव आणि तळामध्ये प्रत्येकी 2, रोह्यात 9, सुधागडमध्ये 1, श्रीवर्धनमध्ये 4, म्हसळ्यात 7, पोलादपूरमध्ये 5 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.


कोणत्या तालुक्यात किती रुग्णांनी केली कोरोनावर मात?

जिल्ह्यात आतापर्यंत 7 हजार 293 रुग्णांनी कोरोनाला हरवले आहे. पनवेल मनपा 3 हजार 546, पनवेल ग्रामीण 1 हजार 124, उरण 474, खालापूर 271, कर्जत 261, पेण 409, अलिबाग 352, मुरुड 70, माणगाव 168, तळा 19, रोहा 287, सुधागड 8, श्रीवर्धन 74, म्हसळा 60, महाड 126, पोलादपूरमधील 44 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here