रायगडांना दिलासा देणारी बातमी…आज कोरोनावर मात करुन 305 जण परतले घरी

0
3037
  • दिवसभरात 342 नवे रुग्ण, सात रुग्णांचा कोरोनाने मृत्यू
  • रायगडात बाधित रुग्णांची संख्या 8 हजारच्या पार

अलिबाग : रायगडकरांसाठी आज एक दिलासा देणारी बातमी आहे. आज दहा-वीस नव्हे तर तब्बल 305 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, हे रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी परतले आहेत. रायगडातच प्रथमच इतक्या मोठ्या संख्येने रुग्णांना एकाच दिवशी रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. तर दुसरीकडे 342 नव्या रुग्णांची नोेंद झाली असून, सात रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्यात मृतांची संख्या 219 वर तर एकूण बाधित रुग्णांची संख्या 8 हजार 105 वर पोहोचली आहे.

रायगडात आज रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. 305 रुग्णांनी कोरोनाचा जोरदार मुकाबलाच नाही केला, तर त्याला हरवून कोरोनाविरुद्धच्या लढाईत विजयही मिळवला. त्यामुळे रुग्णालयातून बाहेर पडताना त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या चेहर्‍यावर हास्य होते. आज रुग्णालयातून सुट्टी मिळालेल्या 305 रुग्णांमध्ये पनवेल महापालिका क्षेत्रातील 181, पनवेल ग्रामीणमधील 35, उरण 28, खालापूरातील 14, पेणमधील 22, अलिबागच्या 7, माणगावातील 1, रोह्यातील 5, श्रीवर्धन तालुक्यातील 3, म्हसळ्यातील 4 आणि महाड तालुक्यातील 5 रुग्णांचा समावेश आहे. आजपर्यंत जिल्ह्यातील 4 हजार 596 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

आज नोंद झालेल्या 342 नव्या रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील सर्वाधिक रुग्ण आहेत. पनवेल मनपा क्षेत्रात 146 तर पनवेलच्या ग्रामीण भागात 59 नव्या कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची नोंद झाली. त्याखालोखाल उरणमध्ये 35 रुग्ण नोंदविण्यात आले आहेत. पेणमध्ये 33, अलिबागमध्ये 28, खालापूरमध्ये 18, कर्जतमध्ये 7, रोह्यात 13, महाडमध्ये 2 पॉझिटीव्ह रुग्णांची आज नोंद झाली आहे. तर सात जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. यात उरणमध्ये 3, खालापूरमध्ये 1, कर्जतमध्ये 1, अलिबागमध्ये 1, महाडमध्ये 1 मृत्यू नोंदविण्यात आला आहे.

जिल्ह्यात आजअखेर एकूण बाधित रुग्णांची संख्या 8 हजार 105 पोहोचली आहे. यापैकी 4 हजार 296 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे तर 219 रुग्णांची कोरोनाविरुद्धची लढाई अपयशी ठरली असून, त्यांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत 3 हजार 290 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत. यात पनवेल मनपा 1 हजार 388, पनवेल ग्रामीण 441, उरण 186, खालापूर 253, कर्जत 103, पेण 315, अलिबाग 225, मुरुड 48, माणगांव 69, तळा 5, रोहा 106, श्रीवर्धन 45, म्हसळा 54, महाड 39 आणि पोलादपूरमधील 13 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

जिल्ह्यात कोरोनाने झालेले एकूण मृत्यू – 219

पनवेल मनपा 96, पनवेल ग्रामीण 30, उरण 13, खालापूर 11, कर्जत 12, पेण 12, अलिबाग 10, मुरुड 6, माणगांव 2, तळा 2, रोहा 3, सुधागड 1, श्रीवर्धन 3, म्हसळा 6, महाड 10 आणि पोलादपूरमधील 2 अशा 219 रुग्णांची कोरोनाशी झुंज अपयशी ठरली आहे.

उपचारानंतर बरे झालेले रुग्ण – 4 हजार 596

पनवेल मनपा 2 हजार 496, पनवेल ग्रामीण 781, उरण 314, खालापूर 59, कर्जत 147, पेण 141, अलिबाग 160, मुरुड 24, माणगांव 113, तळा 15, रोहा 171, सुधागड 7, श्रीवर्धन 34, म्हसळा 36, महाड 66 आणि पोलादपूरमधील 32 अशा 4 हजार 596 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here