अलिबाग तालुक्यात आज कोरोनाचे 33 रुग्ण आढळले…

0
19130
  • बहुतांश रुग्णांना स्थानिक संसर्गातून लागण
  • तालुक्यात बाधित रुग्णांची संख्या 282 वर

अलिबाग : अलिबाग तालुक्यात आज (9 जुलै) कोरोनाचे 33 नवे रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये अलिबाग शहर, वरसोली, गोंधळपाडा, चौल, चेंढरे, चोंढी, पोयनाड, लोणारे, रामराज, धेरंड, आंबेपूर, कुर्डूस, वरसोली, विद्यानगर, शहाबाज, शहापूर, बोडणी येथील रुग्णांचा समावेश आहे. यापैकी बहुतांश रुग्णांना स्थानिक संसर्गातून कोरोनाची लागण झाली आहे. या नवीन रुग्णांमुळे तालुक्यात बाधित रुग्णांची संख्या 282 झाली आहे.

अलिबागचे तहसीलदार सचिन शेजाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, वरसोलीतील ओमकार फ्रेंड्स सर्कलजवळ राहणार्‍या एका 50 वर्षीय व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. गोंधळपाडा येथे 15 वर्षीय मुलाची कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आली आहे. चेंढरे शिवाजी नगर येथील 23 वर्षीय तरुण आणि 47 वर्षीय व्यक्तीला, चोंढी नाका येथे 35 वर्षीय व्यक्तीला कोरोना झाला आहे. अलिबाग शहरातील महाविर चौक येथील अथर्व सोसायटीतील 23 तरुणाची कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आली आहे.

वैभवनगर-अलिबाग येथील 41 वर्षीय महिला, पोयनाड येथील 32 वर्षीय तरुण, लोणारे येथील 30 वर्षीय तरुण, रामराज येथील 34 वर्षीय व्यक्ती, धेरंड येथील 66 वर्षीय वृद्ध व्यक्ती, 26 वर्षीय महिला आणि 36 वर्षीय पुरुष अशा तिघांना कोरोनाची लागण झाली आहे. आंबेपूर येथील 55 वर्षीय व्यक्तीला, चेंढरेतील स्वामी समर्थ नगर येथील 22 वर्षीय तरुणाला व 51 वर्षीय व्यक्तीला, कुर्डूस येथील 32 वर्षीय तरुणाला कोरोना झाला आहे. अलिबाग शहरातील सिद्धार्थ नगर येथे दोन रुग्ण आढळले आहेत. येथील एका 50 वर्षीय पुुरुषाला आणि 45 वर्षीय महिलेला कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आहे.

वरसोली कोळीवाड्यात आज पुन्हा तीन रुग्णांची नोंद झाली आहे. येथील 54 वर्षीय व्यक्ती, 22 वर्षीय आणि 19 वर्षीय तरुण अशा तिघांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. अलिबाग कोळीवाड्यातही तीन रुग्ण आढळले आहेत. येथील 35 वर्षीय आणि 55 वर्षीय अशा दोन पुरुषांना आणि 46 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. अलिबाग शहरातील वैद्यबाग-कामत आळी येथील 39 वर्षीय महिला आणि 38 वर्षीय पुरुष अशा दोघांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

अलिबागमधील शास्त्रीनगर- कोळीवाडा येथील 25 वर्षीय तरुण, विद्यानगर येथील 22 वर्षीय तरुणाला, बोडणी येथील 47 वर्षीय व्यक्तीला, शहाबाज येथील 72 वर्षीय वृद्धाला आणि शहापूर येथील 52 वर्षीय व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर चौल येथेही एका 32 वर्षीय तरुणाला कोरोनाची लागण झाली आहे. तर आज आंबेपूर येथील 2 आणि वेलवली येथील 1 असे तीन रुग्ण कोरोना मुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

दरम्यान, 33 नवीन रुग्णांमुळे तालुक्यात बाधित रुग्णांची संख्या 282 झाली आहे. यापैकी 8 रुग्णांचा मृत्यू झाला असून, 110 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. सद्यस्थितीत 164 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु असल्याचे तहसीलदार शेजाळ यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here