पेणमध्ये 33 नवे कोरोना रुग्ण; बाधित रुग्णांची संख्या 468 वर

0
2041

पेण ः पेण तालुक्यात आज कोरोनाचे 33 नवे रुग्ण नोंद झाले आहेत. तर दिवसभरात 22 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. या नव्या रुग्णांमुळे बाधित रुग्णांची संख्या 468 वर पोहोचली आहे. यापैकी 141 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत.

आज नोंद झालेल्या 33 रुग्णांमध्ये पेण शहरातील 15 आणि ग्रामीण भागातील 18 रुग्णांचा समावेश आहे. ोरी वडखळ 1, पोलीस लाईन-पेण 7, लक्ष्मी बेकरीजवळ-पेण 1, पिंपळपाडा 1, वडखळ 1, समर्थनगर रामवाडी 1, उर्णोली सोनखार 1, काळेश्रीवाडी वढाव 1, हनुमान आळी-पेण 1, चिंचपाडा 4, धोंडपाडा कोप्रोली 1, हमरापूर 1, कवंडाळ तळे-पेण 1, खाटीक आळी पेण 1, गड 1, जोहे 1, नवदुर्ग अपार्टमेंट महाडीक वाडी-पेण 1, तांबडशेत 3, पाटणोली कोप्रोली 3, कणे वाशी 1 अशा 33 जणांची कोरोना चाचणी आज पॉझिटीव्ह आली आहे.

तर 22 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना आज रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. इस्त्रायल आळी-पेण येथील 5, कालई आमटेम 1, समर्थ नगर रामवाडी 1, अष्टविनायक नगर पेण 1, फणसडोंगरी 2, तांबडशेत 1, चिंचपाडा 2, डोलवी 1, शीतल विहार-पेण 1, गोविंद बाग पेण 1, कुंभार आळी-पेण 2, रोहिदासनगर पेण 1, रामवाडी 1, पांडापूर 1 आणि वडगाव येथील एका रुग्णाने कोरोनाला हरवले आहे.

दरम्यान, नव्या रुग्णांमुळे आजअखेर तालुक्यात बाधित रुग्णांची संख्या 468 वर पोहोचली आहे. यापैकी 12 रुग्णांचा मृत्यू झाला असून, 141 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. 315 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत. यात पेण शहरातील 137 तर ग्रामीण पेणमधील 178 रुग्णांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here