रायगडात चोवीस तासांत 338 नवे रुग्ण ; 15 मृत्यू

0
2408
  • दिवसभरात 506 रुग्णांची कोरोनावर मात
    बाधित रुग्णांची संख्या 15 हजार पार
    11 हजार हून अधिक रुग्णांची कोरोनावर मात

अलिबाग : रायगड जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत 338 कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची नोंद झाली असून, 15 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे दिवसभरात 506 रुग्ण कोरोना मुक्त होऊन घरी परतले आहेत. आजअखेर जिल्ह्यात बाधित रुग्णांची संख्या 15 हजार पार गेली आहे. यापैकी अकरा हजारहून अधिक रुग्ण बरे झाले असून, चारशेहून अधिक रुग्ण दगावले आहेत.
आज (31 जुलै) दिवसात कोविड बाधित रुग्ण संख्येत पनवेल महानगरपालिका क्षेत्र 121, पनवेल ग्रामीण 33, उरण 17, खालापूर 35, कर्जत 18, पेण 40, अलिबाग 27, मुरुड 1, माणगाव 17, रोहा 13, सुधागड 3, श्रीवर्धन 1, म्हसळा 2, महाड 9, पोलादपूर 1 अशी 338 ने वाढ झाली आहे. तर दिवसात पनवेल मनपा 5, उरण 2, खालापूर 2, पेण 3, अलिबाग 1, श्रीवर्धन 1, पोलादपूर 1 अशा पंधरा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर दिवसभरात पनवेल मनपा-210, पनवेल ग्रामीण-40, उरण-21, खालापूर-30, कर्जत-16, पेण-55, अलिबाग-42, माणगाव-9, रोहा-28, सुधागड-2,  श्रीवर्धन-1, म्हसळा-6, महाड-40, पोलादपूर-6 असे एकूण 506 रुग्ण कोरोना विरोधातील लढाई जिंकून पूर्णपणे बरे होऊन घरी गेले आहेत. आजअखेर जिल्ह्यातील 11 हजार 594 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

सद्य:स्थितीत जिल्ह्यात पनवेल मनपा-1306, पनवेल ग्रामीण-409, उरण-168, खालापूर-262, कर्जत-108, पेण-267, अलिबाग-180, मुरुड-44, माणगाव-101, तळा-1, रोहा-129, सुधागड-19, श्रीवर्धन-28, म्हसळा-66, महाड-95, पोलादपूर-11 अशा 3 हजार 185 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर कोरोना चाचणी केलेल्या 484 नागरिकांचे अहवाल येणे प्रलंबित आहे.

आतापर्यंत 11 हजार 594 रुग्ण उपचारानंतर बरे
कोविड-19 ने बाधित झालेले मात्र आरोग्य यंत्रणेच्या यशस्वी प्रयत्नानंतर, स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर पनवेल मनपा-5 हजार 157, पनवेल ग्रामीण-1 हजार 643, उरण-671, खालापूर-692, कर्जत-379, पेण-885, अलिबाग-810, मुरुड-90, माणगाव-225, तळा-21, रोहा-420, सुधागड-17, श्रीवर्धन-109, म्हसळा-121, महाड-298,  पोलादपूर-56 अशा एकूण 11 हजार 594 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, ते ठणठणीत बरे झाले आहेत.
मृतांचा आकडा 422 वर
आतापर्यंत पनवेल मनपा-165, पनवेल ग्रामीण-45, उरण-30, खालापूर-33, कर्जत-18, पेण-29, अलिबाग-29, मुरुड-10, माणगाव-3, तळा-2, रोहा-15, सुधागाड-1, श्रीवर्धन-5, म्हसळा-7, महाड-23, पोलादपूर-7 असे एकूण 422 रुग्ण कोरोनाने दगावले आहेत. त्यांना काही ना काही इतर आजार असल्यामुळे ते करोना विरोधातील लढाईत दुर्देवाने यशस्वी होऊ शकले नाहीत, डॉक्टरांचे म्हणणे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here