रायगडात आज कोरोनाचे 391 नवे रुग्ण; 8 जणांचा मृत्यू

0
2526
  • बाधित रुग्णांची संख्या 15 हजार 592 वर

  • 11 हजार 957 रुग्ण उपचारानंतर झाले बरे

अलिबाग : रायगड जिल्ह्यात आज कोरोनाच्या 391 नव्या रुग्णांची नोंद झाली असून, दिवसभरात आठ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. तर 363 रुग्ण कोरोनावर मात करुन आज घरी परतले. आजअखेर जिल्ह्यात बाधित रुग्णांची संख्या 15 हजार 592 वर पोहोचली आहे. यापैकी 11 हजार 957 रुग्ण उपचारानंतर ठणठणीत बरे झाले आहेत.

आज रायगड जिल्ह्यात नोंद झालेल्या 391 कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये पनवेल महापालिका क्षेत्रातील सर्वाधिक 143 रुग्णांचा समावेश आहे. तर पनवेल ग्रामीणमध्ये 37 रुग्णांची नोंद झालेय. उरणमध्ये 18, खालापूरात 38, कर्जतमध्ये 9, पेणमध्ये 22, अलिबागमध्ये 24, मुरुडमध्ये 9, माणगावमध्ये 9, रोहा तालुक्यात 27, सुधागडमध्ये 3, श्रीवर्धनमध्ये 2, म्हसळा तालुक्यात 2, महाडमध्ये 37, पोलादपूरमध्ये 11 रुग्णांची कोरोना चाचणी आज पॉझिटीव्ह आली आहे.

दिवसभरात आठ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला असून, यामध्ये पनवेल (मनपा) 2, पनवेल (ग्रामीण) 2, कर्जत 1, अलिबाग 1, श्रीवर्धन 1, महाडमधील 1 मृत्यू नोंदविण्यात आला आहे. समाधानकारक बाब म्हणजे आज दिवसभरात पनवेल मनपा क्षेत्रातील 143, पनवेल ग्रामीण 48, उरण 20, खालापूर 33, कर्जत 15, पेण 39, अलिबाग 28, माणगाव 18, रोहा 7, सुधागड 5, म्हसळा 2, महाड 1, पोलादपूर 4 अशा 363 रुग्णांनी कोरोना विरोधातील लढाई जिंकली असून, ते पूर्णपणे बरे होऊन घरी गेले आहेत.

3 हजार 205 पॉझिटीव्ह रुग्णांवर सुरु आहेत उपचार

सद्य:स्थितीत जिल्ह्यात पनवेल महापालिका क्षेत्रातील 1 हजार 304, पनवेल ग्रामीणमधील 387, उरणमधील 166, खालापूर 267, कर्जत 101, पेण 250, अलिबाग 175, मुरुड 53, माणगाव 92, तळा 1, रोहा 149, सुधागड 17, श्रीवर्धन 29, म्हसळा 66, महाड 130, पोलादपूर 18 अशा 3 हजार 205 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तपासणीअंती 274 नागरिकांचे कोरोना चाचणी अहवाल येणे प्रलंबित आहे.

आतापर्यंत 11 हजार 957 रुग्णांची कोरोनावर मात

कोविड-19 ने बाधित झालेले, मात्र आरोग्य यंत्रणेच्या यशस्वी प्रयत्नानंतर, स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर पनवेल मनपा क्षेत्रातील 5 हजार 300, पनवेल ग्रामीणमधील 1 हजार 691, उरण-691, खालापूर-725, कर्जत-394, पेण-924, अलिबाग-838, मुरुड-90, माणगाव-243, तळा-21, रोहा-427, सुधागड-22, श्रीवर्धन-109, म्हसळा-123, महाड-299, पोलादपूर-60 अशा 11 हजार 957 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

430 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू

आतापर्यंत पनवेल मनपा-167, पनवेल ग्रामीण-47, उरण-30, खालापूर-33, कर्जत-19, पेण-29, अलिबाग-30, मुरुड-10, माणगाव-3, तळा-2, रोहा-15, सुधागाड-1, श्रीवर्धन-6, म्हसळा-7, महाड-24, पोलादपूर-7 अशा 430 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here