पेण तालुक्यात कोरोनाचे आज 40 नवे रुग्ण; तिघांचा मृत्यू

0
739

दिवसभरात 55 रुग्ण कोरोना मुक्त
बाधित रुग्णांची संख्या 1 हजार 181 वर

पेण : पेण तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. आज नव्याने तालुक्यात 40 जणांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली असून, तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर दिवसभरात 55 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली. आजअखेर पेण तालुक्यात बाधित रुग्णांची संख्या 1 हजार 181 वर पोहोचली आहे. यापैकी 29 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आज कोरोनाची चाचणी पॉझिटीव्ह आलेल्या 40 रुग्णांमध्ये गडब 1, कुंदाताई नगर वडखळ 1, ओढांगी 1, कुंभारआळी-पेण 1, डोलवी 1, बेणेघाट 1, वाशी 1, आराव 1, बेलवडे 1, आनंदनगर रामवाडी 1, वाक्रुळ 1, गडब 1, गोळीबार मैदान 1, उंबर्डे कॉलनी 8, राजू पोटे मार्ग पेण 1, रोहिदासनगर 4, दातारआळी पेण 1, कोंबडपाडा 3, खारकालई आमटेम 1, बेणसे 1, वडखळ 1, अंतोरे 1, झिराळआळी 1, पानेड 1, शेडाशी 1 आणि वढाव येथील 1 रुग्णाचा समावेश आहे. याव्यतिरिक्त फणसडोंगरी-गोळीबार मैदान येथील 72 वर्षीय वृद्ध आणि पेण आंबेगाव येथील 62 वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू झाला होता. या दोघांचीही कोरोना चाचणी आज पॉझिटीव्ह आली आहे. तर सनसिटी सोसायटी-पेण येथील 64 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची नोंद आज करण्यात आली आहे.

कोरोनाच्या विळख्यात अडकलेल्या 55 रुग्णांनी आज दिवसभरात कोरोनावर यशस्वी मात केल्याने या रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आली. यामध्ये वडखळ 2, कांदळे 1, चिंचपाडा 5, लाल बहादूर शास्त्री मार्ग पेण 1, कवंडाळ तळे 3, ओमकार सोसायटी पेण 1, समर्थनगर रामवाडी 1, तरणखोप 5, कोंबडपाडा 1, उचेडे 7, कोळवे कोळीवाडा 3, झिराळआळी 1, रघुलीला रेसिडन्सी पेण 1, कुंभारआळी 1, देवआळी पेण 1, चावडीनाका पेण 1, दामुगडेआळी पेण 1, नाणेगाव 1, खारसापोली 1, वडगाव 2, काश्मिरे 4, नवघर 2, अंतोरे 3, झोतिरपाडा 1, धावटे 1, खाटीकआळी पेण 1, खारपाडा 1, कार्ली 1 आणि बळवली येथील 1 रुग्णाचा समावेश आहे.

आजअखेर नोंद झालेल्या 1 हजार 181 बाधित रुग्णांपैकी 29 रुग्णांचा मृत्यू झाला असून, 885 रुग्ण कोरोनातून सुखरुप बाहेर पडले आहेत. सद्यस्थितीत 267 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत. यामध्ये पेण नगरपालिका हद्दीतील 59 पुरुष व 53 महिला रुग्णांचा तर ग्रामीण भागातील 115 पुरुष व 40 महिला रुग्णांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here