रोह्यात आज 5 रुग्ण; आतापर्यंत 403 बाधित रुग्ण

0
414
  • 9 जणांचा मृत्यू ; तर 4 दिवसांत 90 वाढले
  • 296 बरे होऊन घरी परतले.
रोहा : रोहा तालुक्यात आज पर्यंत  403 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. उपचारा दरम्यान 9 जणांचा मृत्यू झाला असून 19 जुलै पासून 4 दिवसांत 90 रुग्णांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. तर बरे झाल्याने आजपर्यंत 296 जनांना घरी सोडले असल्याची माहिती रोहा तहसील कार्यालयातुन देण्यात आली आहे.

रोहा तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. बुधवारी 24 तर आज ( 23 जुलै) पुन्हा तालुक्यात 5 रुग्णांचे नमुने कोरोनाचे पॉझिटीव्ह आले आहेत. तालुक्यातील एकूण बाधित रुग्णांची संख्या 403 वर गेली आहे. कोरोना रुग्णांची वाढत्या संख्येने रविवार 19 ते 22 जुलै दरम्यान 4 दिवसांत नव्वदी गाठली. या चारपाच दिवसात 90 नवे कोरोना बाधित वाढल्याने रोहेकर धस्तावले गेले. धाटाव मधिल एका कंपनीतील अचानक वाढलेले शंभर कोरोना बाधित रुग्णं बरे झाले असले तरी तिथपासून तालुका व वरसे, रोहा शहरात झपाट्याने वाढणारी बाधित रुग्णांची संख्या काही कमी होण्याचे नाव घेत नाही. गेल्या 5 दिवसांत वाढलेल्या रुग्णसंख्येने तालुका व शहरातील काहीठिकाणी घरे तसेच परिसर कंटेन्मेंट एरिया करण्यात आले आहेत.
जिल्हाधिकारी रायगड यांनी 9 दिवसांच्या घोषित केलेल्या बंदचे सुधारीत तपशील जाहीर केले. परिणामी उघडण्यात आलेल्या अत्यावश्यक दुकानांची वेळ कमी केल्याने बाजारात सकाळी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने हा आजार बळावण्याची भीती व्यक्त होत आहे. सद्यस्थितीत 96 रुग्णांवर पुढील औषधोपचार सुरु असल्याची माहिती रोहा तहसील कार्यालयाकडून देण्यात आली असून वाढणाऱ्या कोरोना बधितांच्या आकडेवारीने तालुक्यात असलेले चिंतेचे वातावरण मात्र कायम आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here