रायगडमध्ये कोरोना वेगाने पसरतोय…524 नवे कोरोना रुग्ण; 17 रुग्णांचा मृत्यू

0
4138
आज आतापर्यंतच्या सर्वाधिक कोरोना रुग्णांची आणि मृत्यूंची नोंद

अलिबाग : लॉकडाऊन घेतल्यानंतर रायगड जिल्ह्यात कोरोना वेगाने पसरत असल्याचे रुग्णांच्या आकडेवारीवरुन दिसते आहे. आज (19 जुलै) 524 नवे पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले असून, 17 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंतची सर्वाधिक रुग्णवाढ आणि मृत्यूंची नोंद असून, बाधित रुग्णांच्या संख्येने दहा हजारांचा आकडा ओलांडला आहे.

आजअखेर जिल्ह्यात बाधित रुग्णांची संख्या 10 हजार 487 वर पोहोचली आहे. यापैकी 277 जणांचा मृत्यू झाला असून, 6 हजार 477 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सद्यस्थितीत 3 हजार 733 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर कोरोना चाचणी केलेल्या 440 नागरिकांचे कोरोना अहवाल प्रलंबित आहेत. आज जिल्ह्यात आतापर्यंतची सर्वाधिक रुग्णवाढ आणि सर्वाधिक मृत्यू नोंदवले गेल्याने रायगडकरांमधून चिंता व्यक्त केली जात आहे. कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यात आणि प्रभावी उपाययोजना करण्यात जिल्हा प्रशासन अपयशी ठरताना दिसते आहेत.

आज नोंद झालेल्या नव्या रुग्णांमध्ये पनवेल महापालिका क्षेत्रातील 139, पनवेल ग्रामीणमधील 42 रुग्णांचा समावेश आहे. अलिबाग, पेण, खालापूरमध्येही आज मोठ्या संख्येने रुग्ण आढळले आहेत. पेणमध्ये 92, खालापूरमध्ये 82 आणि अलिबागमध्ये 71 जणांची कोरोना चाचणी आज पॉझिटीव्ह आली आहे. उरणमध्ये 18, कर्जतमध्ये 16, माणगांवमध्ये 11, रोह्यात 27, श्रीवर्धन 4, म्हसळा 10, महाडमध्ये 11, पोलादपूरमध्ये 1 रुग्णाची नोंद झाली. आज एक, दोन नव्हे तर 17 जणांचा कोरोनाने बळी घेतला असून, जिल्ह्यात आतापर्यंत एकाच दिवशी झालेले हे सर्वाधिक मृत्यू आहेत. यात पनवेल मनपा 4, पनवेल ग्रामीण 1, खालापूर 1, पेणमध्ये 4, अलिबागमध्ये 3, रोह्यात 3 आणि पोलादपूरमध्ये एकाचा मृत्यू झाला आहे.

त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणजे आज 252 रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. उपचारानंतर बरे झाल्याने पनवेल मनपा क्षेत्रातील 98, पनवेल ग्रामीणमधील 19, उरणमधील 13, कर्जतमध्ये 2, पेणमध्ये 57, अलिबागमध्ये 12, मुरुडमध्ये 10, रोह्यात 24, श्रीवर्धनमध्ये 5, म्हसळ्यात 3, महाडमध्ये 8 आणि पोलादपूरमध्ये 1 रुग्णाला रुग्णालयातून सुट्टी मिळाली. आतापर्यंत 6 हजार 477 रुग्णांनी कोरोनाला पराभूत करुन या आजारावर यशस्वी मात केली आहे.

सद्यस्थितीत जिल्ह्यातील 1 हजार 431, पनवेल ग्रामीणमधील 502, उरण 163, खालापूर 410, कर्जत 114, पेण 416, अलिबाग 389, मुरुड 46, माणगाव 48, तळा 2, रोहा 60, सुधागड 1, श्रीवर्धन 35, म्हसळा 55, महाड 54, पोलादपूर 7 अशा एकूण 3 हजार 733 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here