म्हसळा तालुक्यात कोरोनाचे 6 नवे रुग्ण ; बाधितांची संख्या झाली 192 वर

0
707

सुशील यादव/म्हसळा : म्हसळा तालुक्यात आज (29 जुलै) कोरोनाच्या 6 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे बाधित रुग्णांची संख्या 192 झाली आहे.
आज नोंद झालेल्या 6 नव्या रुग्णांमध्ये तुरुंबाडी येथील 3, लिपणीवावे येथील 1, वांगणी येथील 1 तर काझी मोहल्ला म्हसळा येथील एका रुग्णाचा समावेश आहे. त्यामुळे म्हसळा तालुक्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 192 वर पोहोचली आहे, अशी माहिती म्हसळा तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी शरद गोसावी यांनी दिली. बाधित रुग्णांपैकी 114 रुग्ण कोरोना मुक्त झाले असून 7 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत 71 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here