कर्जत तालुक्यात आज 7 नवीन कोरोना रुग्ण; एकाचा मृत्यू

0
758

बाधित रुग्णांची संख्या 262 वर

कर्जत : कर्जत तालुक्यात कोरोनाचा प्रसार वाढत चालला असून शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही तो वाढत आहे. आज (13 जुलै) तालुक्यातील सात जणांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली असून, एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तालुक्यातील आतापर्यंतच्या रुग्णांची संख्या 262 वर पोहोचली असून मृत पावलेल्या रुग्णांची संख्या 12 झाली आहे.

आज कर्जत शहरातील कोतवाल नगरमध्ये याआधी पॉझिटीव्ह आलेल्या तरुणाच्या 64 वर्षीय वडिलांना आणि 30 वर्षीय पत्नीला कोरोनाची लागण झाली आहे. तर या रुग्णाची 55 वर्षीय आई 10 जुलै रोजी मरण पावली होती. त्यांचा रिपोर्टही कोरोना पॉझिटीव्ह आला आहे. भिसेगावमधील एक 69 वर्षीय व्यक्तीचा कोरोना टेस्टचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला असून ही व्यक्ती निवृत्त रेल्वे कर्मचारी आहे.

मुंबई महापालिकेत नोकरी करीत असलेल्या एका व्यक्तीला 9 जुलै रोजी कोरोनाची बाधा झाली होती. त्या व्यक्तीच्या 45 वर्षांच्या पत्नी व 23 वर्षीय सुनेचा कोरोना टेस्टचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. कडाव येथील 28 वर्षीय महिलेलाही कोरोनाची बाधा झाली आहे. तसेच नेरळनजीकच्या जिते गावात राहणार्‍या एका 45 वर्षांच्या व्यक्तीचा कोरोना टेस्टचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.

दरम्यान, तालुक्यात बाधित रुग्णांची संख्या 262 वर पोहोचली आहे. यापैकी 147 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून, 12 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत 103 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here