गुहागर ते बोरीवली एसटी कलंडली

17 May 2019 10:35:12
 

पोलादपूर | गुहागर आगाराची गुहागर ते बोरीवली एस.टी.बस पोलादपूर शहरातील ग्रामदैवत श्रीकाळभैरवनाथ मंदिराच्या कमानीजवळ एलऍण्डटीने खोदलेल्या चरात कलंडली. सुदैवाने सर्व प्रवासी सुखरूप असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ च्या चौपदरीकरणाचे काम प्रगतीपथावर असताना ठेकेदार कंपनी लार्सन ऍण्ड टूब्रोने शहरातील ग्रामदैवत श्रीकाळभैरवनाथ मंदिराच्या कमानीजवळ खोदकाम करून खणलेल्या चरांमुळे महामार्गाची साईडपट्टी अरूंद झाली आहे. मंदिरालगतच रयत शिक्षण संस्थेचे विद्यामंदिर पोलादपूर असल्याने याठिकाणी रम्बलर स्ट्रीप्सचे गतिरोधकही आहेत. याठिकाणी सकाळी सव्वाअकरा वाजण्याच्या सुमारास गुहागर ते बोरीवली एस.टी.बस साईडपट्टी नसलेल्या ठिकाणी एलऍण्डटीने खोदलेल्या चरात कलंडली.

Powered By Sangraha 9.0