जिल्हाधिकारी निधी चौधरी यांचे आवाहन
अलिबाग : रायगड जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. भात पिकाचे तर प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. मात्र शासकीय यंत्रणा पंचनामे कारण्यासाठी न पोहोचल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप आहे. अशा पंचनामे न झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना गुगल लिंकद्वारे ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केले आहे.
ऑक्टोबर 2020 मध्ये रायगड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झालेले आहे. पिकांच्या नुकसानीबाबतचे पंचनामे करण्याचे आदेश संबंधित शासकीय यंत्रणेला देण्यात आले आहेत. मात्र अद्यापही शासकीय यंत्रणा पंचनामा करण्यासाठी आपल्यापर्यंत पोहोचली नसेल, तर संबंधित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी
https://docs.google.com/forms/d/1W944r3a8eXfK_H8V8zEiOhl7vLDHr8I4pvqLm93BJL0/edit या गुगल लिंकवर नुकसानीचा अर्ज भरावा. तसेच ज्यांचे नुकसानीचे पंचनामे झालेले नाहीत, त्यांनीच हा अर्ज भरावा, याचीही काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी सर्व शेतकरी बांधवांना केले आहे.