म्हसळा । शहरातील वार्ड क्रमांक 9 व 14 मध्ये नगरपंचायतमार्फत होणारा पाणीपुरवठा अपुरा व दूषित होत असल्याने नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नागरीकांना स्वच्छ पाणी मिळावे यासाठी काँग्रेसच्या शहराध्यक्षा नाझिमा मुकादम यांनी आमरण उपोषण पुकारले आहे.
इदगा परिसरातील नागरीकांना पावसाळ्यातसुद्धा पाणी पुरवठा योग्य तर्हेने होत नव्हता. पाणी भरण्यासाठी नागरिकांना खोल, निसरड्या मार्गावरून जावे लागते, वार्ड क्रमांक 9 मध्ये असणारे पिण्याचे पाण्याच्या टाकी भोवती कुत्रे-मांजरांचा वावर असतो तेच पाणी नागरिकांना प्यावे लागत असल्याचे मुकादम यांचे म्हणने आहे.
याबाबत त्यांनी अनेकदा पाठपुरावा नगरपालीकेकडे केला आहे मात्र तिकडे दुर्लक्ष होत आहे. शेवटी सोमवार दिनांक 26 ऑक्टोबर 2020 पासून सकाळी 10 वाजल्यापासून आमरण उपोषण सुरु झाले आहे.
उपोषणात नाझीमा मुकादम यांच्या सह तालुका अध्यक्ष डॉ. मुईज शेख, श्रीवर्धन विधानसभा अध्यक्ष बशीर भुरे,शहर अध्यक्ष बाबा हुर्झुक, रफिक घरटकर, सुफियान हालडे, मुबशीर हुर्झुक, अमिना वस्ता, शमीम काझी, शरीफा साने, आरती पेडणेकर, गंगू चव्हाण आदि कार्यकर्ते सहभागी झाले होते.