सुशील यादव/ म्हसळा । मुंबईतुन चोरुन आणलेल्या दुचाकी स्वारावर म्हसळा पोलीसांची नजर पडली आणि गडी गावाला पोहचण्याआधीच पोलीस कस्टडीत पोहचला.
अंकुश यशवंत गोमाणे (वय 24) हा तरुण मुंबईकडून म्हसळा येथे दुचाकीवरुन येत होता. रात्री 3 वाजण्याच्या सुमारास त्याला साई चेकनाक्यावर पोलीसांनी अडवले. गाडीची कागदपत्रे मागितली असता त्याचे पितळ उघडे पडले.
ही गाडी मुंबई येथील अश्वीन शहा यांच्या मालकीची असल्याचे उघड झाले. यानंतर म्हसळा पोलीसांनी या तरुणाला ताब्यात घेतले असून त्याच्याविरोधात गु.र.नं.55/20 मुंबई पोलीस अधिनियम 1951इतर प्रमाणे गुन्हा नोंदविला आहे.
म्हसळा पोलीस स्टेशनचे कॉस्टेबल संदीप रामचंद्र फोंडे यांनी ही कार्यवाही केली. गुन्ह्याचा तपास पो.ह.संदीप चव्हाण करीत आहेत.