वनक्षेत्रपाल समीर शिंदे यांनी सुखरूप सोडले जंगलात
गौसखान पठाण/सुधागड-पाली । पालीतील वाघजाई नगर येथे सिद्धेश सावंत यांच्या घराजवळ मंगळवारी (ता.17) दुर्मिळ खापर खवल्या जातीचा साप आला होता. त्यांनी त्या सापाला सुखरूप ठेवून सर्पमित्र तुषार केळकर यांना बोलावले. केळकर यांनी सापाला सुधागड वनक्षेत्रपाल समीर शिंदे यांच्याकडे सुपूर्द केले. त्यांनी या सापाला सुखरूप जंगलात नेऊन सोडले.
सर्पमित्र तुषार केळकर यांनी संगितले की खापर खवल्या हा साप दुर्मिळ असून बिनविषारी साप आहे. अनेकजण त्याला मांडूळ समजून फसतात. हा साप जास्तीत जास्त इंच लांबीचा असून त्याचे शरीर इतरांच्या मानाने बारीक असते.
---------------------------------------------------------------------------------
हा साप अतिशय दुर्मीळ आहे. या सापाच्या फिपसन्स, इलॉथ, मोठया खवल्यांचा खापर खवल्या, महाबळेश्वरी खापर खवल्या अशा चार उपजाती आहेत. तालुक्यात सुज्ञ नागरिक व सर्पमित्रांच्या माध्यमातून अनेक सापांना जीवदान मिळत आहे.
समीर शिंदे, वनक्षेत्रपाल, पाली-सुधागड