रुग्ण्यालयातून मिळाला डिस्चार्ज
अलिबाग । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे यांनी कोरोनावर मात केली आहे. आज (2 नोव्हेंबर) त्यांना मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांना कोरोनाची लागण झाली होती. 27 ऑक्टोबर रोजी त्यांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तशी माहिती त्यांनी समाज माध्यमांद्वारे दिली होती.
सात दिवसांच्या उपचारानंतर आज सुनील तटकरे यांनी कोरोनाला हरवले आहे. आज दुपारी त्यांची कोरोना चाचणी नेगेटीव्ह आल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.