खारघर । लॉकडाऊनच्या काळात वाढदिवस साजरा करणारे खारघर येथील भाजपाचे नगरसेवक निलेश बाविस्कर यांच्याविरोधात खारघर पोलीसानी गुन्हा दाखल केला आहे. खारघर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांनी ही कारवाई केली.
रविवारी रात्रीच्या सुमारास खारघर येथील सेक्टर 18 मध्ये पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक निलेश बाविस्कर यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीमध्ये गर्दी झाली होती. याबाबत काही नागरिकांनी पोलीस ठाण्यात दूरध्वनीद्वारे सदरची माहिती दिल्यानंतर खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी शासनाच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आले.
यानंतर खारघरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांनी बाविस्कर यांच्यावर गुन्हा दाखल केला होता.