पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांच्या हस्ते सन्मानित
अलिबाग । रायगड जिल्हा पोलीस दलातील 28 पोलीस अंमलदार यांना पदोन्नती मिळाली आहे. याबाबतचे आदेश काल (24 नोव्हेंबर) निर्गमित करण्यात आले आहेत. या पदोन्नत झालेल्या पोलीस अंमलदारांना आज पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
रायगड जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील एकूण 28 पोलीस अंमलदार यांना 24 नोव्हेंबर रोजी पदोन्नतीचे आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत.
त्यापैकी 17 पोलीस हवालदार यांना सहायक पोलीस उपनिरीक्षक पदावर, 9 पोलीस नाईक यांना पोलीस हवालदार या पदावर तर 2 पोलीस शिपाई यांना पोलीस नाईक या पदावर पदोन्नती देण्यात आलेली आहे.
त्यानुसार आज (25 नोव्हेंबर) पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी सर्व पदोन्नती मिळालेल्या पोलीस अंमलदार यांना शुभेच्छा देऊन स्वत:च्या हस्ते पदोन्नतीच्या पदातील स्टार लावून सन्मानित केले आहे.