पाणी टंचाईवर मात करण्यासाठी पालिकर एकवटले

28 Nov 2020 11:52:11
sudhagad-pali_1 &nbs
 
अंबा नदीचा गाळ काढण्यासाठी रविवारी श्रमदान मोहिमेचे आयोजन
 
सुधागड-पाली । पाली येथे अंबा नदीवर असलेली जॅकवेल गाळाने भरली आहे. परिणामी पालिकरांवर अघोषित पाणी टंचाईचे संकट ओढवले आहे. म्हणूनच या समस्येवर मात करण्यासाठी पालिकर एकवटले आहेत. रविवारी (ता.29) सकाळी 8 वाजता श्रमदान मोहिमेद्वारे जॅकवेल मधील गाळ काढण्यात येणार आहे.

sudhagad-pali 2_1 &n 
 
पाली गावाला येथील अंबा नदीतून पाणी पुरवठा केला जातो. नदीलगत असलेल्या जॅकवेल मधून पंपाने पाणी काढून ते साठवण टाक्या व ग्रामस्थांना सोडले जाते. मात्र ही जॅकवेल गाळ व चिखलाने भरली आहे. त्यामुळे पंपात चिखल, शेवाळ व केरकचरा जाऊन पंप नादुरुस्त होतात. तसेच गाळामुळे पाणी देखील मुबलक येत नाही. आणि या कारणांनी पालीत वारंवार पाणी पुरवठा खंडित होतो. त्यामुळे ही जॅकवेल साफ करण्याचे काम एक संघर्ष समाजसेवेसाठी या ग्रुपने करण्याचे ठरवले आहे. या श्रमदान मोहिमेत समस्त पाली करांनी सहभागी होऊन हाथभार लावावा असे आवाहन करण्यात आले आहे. मोहिमेत सहभागी होण्यासाठी श्रीकांत ठोंबरे 8087438797, अमित निंबाळकर 9273790850 व भास्कर दुर्गे 9422494521 यांना संपर्क करावा.
 
Powered By Sangraha 9.0