file photo
पादचार्याचा मृत्यू; वाहनचालक फरार
अलिबाग । वडखळ पुलावरुन चालणार्या एका पादचार्याला अज्ञात वाहन चालकाने ठोकर दिली. माणुसकी तेव्हा मेली, जेव्हा या चालकाने या जखमी पादचार्याला रुग्णालयात दाखल करण्याऐवजी पुलावरुन खाली फेकून दिले आणि फरार झाला. मृताची अद्याप ओळख पटलेली नाही.
शनिवारी 31 ऑक्टोबर रोजी ही घटना घडली. मुंबई-गोवा महामार्गावरील डोलवी ते कांदळेपाडा या बायपास रोडवर असलेल्या पुलावरुन एक व्यक्ती चालत जात निघाली होती. वडखळदरम्यान एका अज्ञात वाहन चालकाने त्याला ठोकर दिली. यानंतर त्याने जखमी पादचार्याला रुग्णालयात दाखल करण्याऐवजी पुलावरुन खाली फेकून दिले.
याघटनेनंतर अज्ञात वाहन चालक फरार झाला असून त्याच्याविरोधात भादंवि कलम 304अ, 279, 337, 338, 201 मोटार वाहन अधिनियम 1988 चे कलम 184, 134 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक बाळ कुंभार करीत आहेत.