कचरा टाकणे आले अंगाशी! पोलिसांनी ठोकल्या बेड्या

By Raigad Times    30-Nov-2020
Total Views |
Garbage_1  H x
 
खारघर पोलिसांची कारवाई
 
पनवेल । बाहेरील कचरा आणून खारघर परिसरात टाकून पसार होणार्‍या ट्रक चालकाला खारघर पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्यानंतर महापालिकेच्या अधिकार्‍यांना बोलावून या ट्रकचालकावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
 
गेल्या काही महिन्यांपासून खारघरमध्ये बाहेरुन कचरा आणून टाकला जात होता. ट्रकद्वारे कचरा टाकून पसार होण्याचे प्रकार वारंवार घडत होते. याबाबत स्थानिक नागरिकांनी खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांच्याकडे तक्रार करताच त्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास सापळा रचला.
 
पुन्हा एकदा कचरा टाकून पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना त्या ट्रक चालकाला खारघर पोलिसांनी अखेर अटक केली. पनवेल महानगरपालिकेच्या अधिकार्‍यांना बोलावून त्या ट्रक चालकावर 10 हजारांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

Kharghar Police_PI Shatru 
 
दरम्यान, अशा प्रकारे कोणी कचरा टाकून पळून जात असेल तर त्याचा फोटो 9892771772 या भ्रमणध्वनी क्रमांकावर अथवा पोलीस ठाणे येथील दूरध्वनी क्र. 022-22742500 येथे कळवावे, असे आवाहन खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांनी केले आहे.