दिवसभरात 67 रुग्णांची कोरोनावर मात
अलिबाग । रायगडात आज कोरोनाच्या 74 नव्या रुग्णांची नोंद झाली असून, दिवसभरात 67 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली. सुदैवाने सलग दुसर्या दिवशी एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही.
आजअखेर जिल्ह्यात एकूण 57 हजार 144 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी 54 हजार 369 रुग्ण कोरोनावर मात करुन सुखरुप घरी परतले. तर दुर्दैवाने 1 हजार 603 रुग्णांची कोरोनाशी झुंज अपयशी ठरल्याने त्यांचा मृत्यू झाला. सद्यस्थितीत 1 हजार 172 रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.
आज (30 नोव्हेंबर) कोरोना पॉझिटीव्ह आलेल्या, कोरोनावर मात केलेल्या रुग्णांचा तपशील खालीलप्रमाणे :