पनवेल तालुक्यातील 91 रुग्णांचा समावेश
अलिबाग । रायगडात आज खूप दिवसांनी कोरोना रुग्णांमध्ये तीन अंकी संख्येने वाढ झाली आहे. आज 117 नव्या रुग्णांची नोंद झाली असून 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर दिवसभरात 84 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली.
आजअखेर जिल्ह्यात एकूण 59 हजार 391 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी 57 हजार 75 रुग्ण कोरोनावर मात करुन सुखरुप घरी परतले. तर दुर्दैवाने 1 हजार 624 रुग्णांची कोरोनाशी झुंज अपयशी ठरल्याने त्यांचा मृत्यू झाला. सद्यस्थितीत 692 रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.
जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96 टक्के आहे. तर मृतांचे प्रमाण एकूण रुग्णांच्या 3 टक्के आहे. सद्यस्थितीत केवळ 1 टक्के पॉझिटीव्ह रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.
आज (18 डिसेंबर) कोरोना पॉझिटीव्ह आलेल्या, कोरोनावर मात केलेल्या व मृत्यू झालेल्या रुग्णांचा तपशील खालीलप्रमाणे :
तालुकानिहाय कोरोना रुग्णांची सद्यस्थिती