शिवप्रेमी आणि पर्यटकांसाठी आनंदाची बातमी; किल्ले रायगडची रोप वे सेवा आजपासून सुरू

04 Dec 2020 11:35:25
raigad_1  H x W
 
अलिबाग : किल्ले रायगडावर येणारे शिवप्रेमी आणि पर्यटकांसाठी आनंदाची बातमी आहे. किल्ले रायगडवर जाण्यासाठी असलेली रोप वे सेवा आजपासून (शुक्रवार) सुरू झाली आहे. मागील 8 महिन्यांपासून ही सेवा बंद होती. रोप वे ची सेवा सुरु झाल्यामुळे पर्यटकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
 
जागेचा वादामुळे देशात अनलॉक झाल्यानंतरही रोप वे बंद होते. रायगडच्या पायथ्याशी असलेल्या गावातील स्थानिक नागरिकांच्या जागेवरून हा वाद निर्माण झाला होता. हे प्रकरण अखेर महाडच्या न्यायालयात गेले. न्यायालयाने मागील आठवड्यात वादग्रस्त जागा वगळून रोप वे सुरू करण्यास परवानगी दिली होती.
 
त्यानंतर रोप वेच्या देखभाल दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले. ते काम पूर्ण झाल्यानंतर चाचणी झाली. ती यशस्वी झाल्यानंतर आज सकाळपासून रोप वे ची सेवा पूर्ववत सुरू करण्यात आली आहे. सकाळी पहिली ट्रॉली किल्ले रायगडकडे रवाना झाली. रोप वे ची सेवा सुरु झाल्यामुळे पर्यटकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Powered By Sangraha 9.0