खोपोली, खालापूर नगरपंचायत कर्मचार्‍यांनी केले काम बंद आंदोलन

Raigad Times    18-Aug-2020
Total Views |
 

संदीप ओव्हाळ/खोपोली । खोपोली नगरपरिषद आणि खालापूर नगरपंचायतीच्या कर्मचार्‍यांनी आज (17 ऑगस्ट) विविध मागण्यांसाठी एक दिवसीय काम बंद आंदोलन केले. सातवा वेतन आयोगाचा पहिला हप्ता रोखीने देण्याबरोबर विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले.

महाराष्ट्र नगरपालिका, नगरपंचायत, संवर्ग कर्मचारी संघटनेच्यावतीने संपूर्ण राज्यभर आज काम बंद आंदोलनाचे आवाहन करण्यात आले होते. त्याला खोपोली नगरपरिषद, खालापूर नगरपंचायत कर्मचार्‍यांनी पाठींबा देत आंदोलनात सहभाग घेतला. नगरपरिषद तसेच नगरपंचायतीमधील सर्व कर्मचार्‍यांंना सातवा वेतन आयोगाचा पहिला हप्ता रोखीने देणे, शंभर टक्के वेतन शासनाच्या कोषागार कार्यालयातून देण्यात यावे, नगरपरिषद-पंचायतीच्या कर्मचार्‍यांचे एकाच वेळी समावेशन करणे, रोजंदारी कर्मचार्‍यांचे एकाच वेळी समावेशन करणे, अभियंता अग्निशमन दल लेखा व अधिकार्‍यांना प्रशासकीय सेवांच्या निवड श्रेणी लागू करणे, नगरपरिषद कर्मचार्‍यांचा आकृतिबंध आराखडा तयार करणे, सफाई कर्मचार्‍यांना मोफत घर बांधून देणे, स्वच्छता निरीक्षकांचा संवर्ग तयार करणे, 2005 च्या कर्मचार्‍यांना डीसीपीएस, जुनी पेन्शन योजना लागू करणे, कोरोना काळात कर्तव्य बजावताना मृत्यू झालेल्या कर्मचार्‍यांना 50 लाखांच्या विम्याचा मोबदला त्वरित देणे, अशा विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.

खोपोली नगरपरिषदेच्या कार्यालयासमोर आंदोलनात सल्लागार देवराम मुके, जिल्हा उपाध्यक्ष गणेश साळवे, स्थानिक संघटनेचे अध्यक्ष मंगेश वाणी, महिला सदस्य मिनल जाधव, बबन वाघमारे, काशिनाथ गायकवाड, दिलीप सोनावणे, अशोक पवार, महेश सोळंकी, दिलीप मोरे, मोहन मोरे, स्थानिक संघटना प्रतिनिधी यांच्यासह इतर कर्मचारी व महिला तसेच खालापूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष शिवानी जंगम तसेच मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांनी कामबंद आंदोलनात कर्मचारी यांच्यासमवेत नगरपंचायतीच्या कार्यालयासमोर बसून पाठींबा देत आपले विचार मांडले. यावेळी जिल्हाध्यक्ष त्रिंबक देशमुख, गोविंद भिसे यांच्यासह इतर कर्मचारी व महिला कर्मचार्‍यांची मोठ्या संख्येने उपस्थित राहत कामबंद आंदोलन यशस्वी केले आहे.

खोपोली नगरपरिषदेच्या कार्यालयासमोर आंदोलनात सल्लागार देवराम मुके, जिल्हा उपाध्यक्ष गणेश साळवे, स्थानिक संघटनेचे अध्यक्ष मंगेश वाणी, महिला सदस्य मिनल जाधव, बबन वाघमारे, काशिनाथ गायकवाड, दिलीप सोनावणे, अशोक पवार, महेश सोळंकी, दिलीप मोरे, मोहन मोरे.

खालापूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष शिवानी जंगम व मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांनी पाठींबा देत कर्मचार्‍यांमवेत बसल्या असल्याचे दिसत आहे.