संदीप ओव्हाळ/ खोपोली । कोरोना काळात अनेकांचा रोजगार गेला आहे. पालकवर्ग आर्थिक अडचणीत असताना, 2020-21 या वार्षिक शैक्षणिक वर्षात के.एम.सी. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून संस्थेच्या विकासाकरीता विकास निधीच्या नावावर ज्यादा फी आकारल्याने पालकांचे कंबरडे मोडले आहे. याची गंभीर दखल घेत, खालापूर तालुका युवासेनेने फी वाढीला विरोध दर्शविला आहे.
खालापूर तालुका युवासेना पदाधिकार्यांंनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. वाढीव फीला विरोध दर्शवत मुंबई विद्यापीठ सिनेट सदस्य अॅड.वैभव थोरात, युवासेना रायगड जिल्हा विस्तारक ओमकार चव्हाण, जिल्हा अधिकारी मयुर जोशी, चिटणीस प्रशांत खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली खालापूर तालुका अधिकारी महेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज (19 ऑगस्ट) के.एम.सी महाविद्यालयाचे प्राचार्य खानविलकर यांना निवेदन दिले आहे. याप्रसंगी युवासेना रायगड जिल्हा चिटणीस प्रशांत खांडेकर, खालापूर तालुका अधिकारी महेश पाटील, उपअधिकारी रुपेश चोगले, चिटणीस प्रसाद देशमुख, सामाजिक युवानेते समाधान दिसले, खोपोली उपशहर अधिकारी कल्पेश लोवंशी, योगेश जाधव आदी उपस्थित होते.
खालापूर तालुक्यातील के.टी.एम.सी. मंडळ गेल्या काही वर्षापासून आर्थिक अडचणीत सापडली आहे. याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांवर होते असून, नाहक आर्थिक भुर्दंड पालक व विद्यार्थी यांना सोसावा लागत आहे. कोरोना महामारीने अनेक पालक आर्थिक अडचणीत आहेत. त्यात पुन्हा 2020-2021 या वार्षिक शैक्षणिक वर्षात के.एम.सी.महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून संस्थेच्या विकासाकरिता विकास निधी म्हणून काही शुल्क आकारण्यात येत आहे. प्रथम, द्वितीय आणि तृतीय शैक्षणिक वर्षात प्रवेश घेणार्या विद्यार्थ्यांकडून विकास निधी म्हणून हे शुल्क आकारण्यात येत आहे. मात्र हे वाढीव शुल्क देण्यास काही विद्यार्थ्यांनी विरोध दर्शविला आहे.
विद्यार्थ्यांची समस्या जाणून घेत युवासेना पदाधिकारी वर्गाने विद्यार्थ्यांशी संवाद साधला. खालापूर तालुका युवासेनेच्यावतीने कॉलेजमध्ये प्राचार्य खानविलकर यांच्याकडे आज (19 ऑगस्ट) निवेदन देत विकास निधी घेऊ नये, अशी मागणी केली आहे. कोरोनामुळे राज्यातील व्यवसाय, खाजगी नोकरी इत्यादी क्षेत्रात काम करणार्या नागरिकांच्या आर्थिक परिस्थितीवर परिणाम झालेला आहे. याला अनुसरून मुंबई विद्यापीठाने दिलेल्या परिपत्रकानुसार विद्यार्थ्यांवर अतिरिक्त कॉलेज फीचा भार देऊ नका आणि सदर परिस्थितीचा विचार करीत विद्यार्थ्यांकडून विकास निधी घेऊ नका, असे अवाहन केले असल्याचे युवासेना तालुका अधिकारी महेश पाटील यांनी निदर्शनास आणून दिले आहे.