अलिबाग । रायगड जिल्ह्यात आज कोरोनाच्या 448 नव्या रुग्णांची नोंद झाली असून, सात रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर दिवसभरात 401 रुग्णांनी कोरोनावर मात केली. आजअखेर जिल्ह्यात बाधित रुग्णांची संख्या 23 हजार 335 वर पोहोचली आहे. यापैकी 19 हजारहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत.
आजच्या (21 ऑगस्ट) दिवसात कोविड बाधित रुग्ण संख्येत पनवेल मनपा-165, पनवेल ग्रामीण-67, उरण-9, खालापूर-29, कर्जत-16, पेण-32, अलिबाग-58, मुरुड-2, माणगाव-14, रोहा-19, सुधागाड-9, श्रीवर्धन-5, म्हसळा-1, महाड-20, पोलादपूर-2 अशी 448 ने वाढ झाली आहे. तर पनवेल (मनपा) 1, कर्जत-1, अलिबाग-2, मुरुड-1, माणगाव-1, श्रीवर्धन-1 अशा सात रुग्णांचा मृत्यू झाला.
आज दिवसभरात पनवेल मनपा-160, पनवेल ग्रामीण-60, खालापूर-12, कर्जत-3, पेण-35, अलिबाग-35, मुरुड-2, माणगाव-41, रोहा-10, सुधागड-5, म्हसळा-2, महाड-34, पोलादपूर-2 असे एकूण 401 रुग्ण उपचारानंतर ठणठणीत बरे झाले आहेत.
सद्य:स्थितीत जिल्ह्यात पनवेल मनपा-1 हजार 429, पनवेल ग्रामीण-427, उरण-183, खालापूर-224, कर्जत-88, पेण-246, अलिबाग-298, मुरुड-28, माणगाव-122, तळा-14, रोहा-184, सुधागड-45, श्रीवर्धन-34, म्हसळा-13, महाड-167, पोलादपूर-18 अशा एकूण 3 हजार 520 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
19 हजार 126 रुग्णांची कोरोनावर मात
आजअखेर जिल्ह्यातील पनवेल मनपा-8 हजार 266, पनवेल ग्रामीण-2 हजार 531, उरण-980, खालापूर-1 हजार 236, कर्जत-614, पेण-1 हजार 563, अलिबाग-1 हजार 309, मुरुड-160, माणगाव-474, तळा-24, रोहा-827, सुधागड-76, श्रीवर्धन-167, म्हसळा-202, महाड-607, पोलादपूर-90 अशा 19 हजार 126 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
जिल्ह्यातील 689 रुग्णांचा मृत्यू
आतापर्यंत पनवेल मनपा-251, पनवेल ग्रामीण-60, उरण-57, खालापूर-54, कर्जत-36, पेण-52, अलिबाग-48, मुरुड-18, माणगाव-13, तळा-2, रोहा-28, सुधागाड-3, श्रीवर्धन-13, म्हसळा-8, महाड-35, पोलादपूर-11 असे एकूण 689 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.