अलिबाग । रायगड जिल्ह्यात आज कोरोनाच्या 475 नव्या रुग्णांची नोंद झाली असून, दिवसभरात 11 रुग्णांचा मृत्यू झाला. तर आज 346 रुग्णांनी कोरोनावर मात केली. आजअखेर जिल्ह्याज कोरोना बाधित रुग्णांची संख्या 26 हजार 74 वर पोहोचली आहे.
कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांपैकी 22 हजार 136 रुग्ण उपचारानंतर ठणठणीत बरे झाले असून, 779 रुग्णांचा मृत्यू झाला. सद्यस्थितीत जिल्ह्यात 3 हजार 159 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत.